Russia Threatens India: रशियाने भारताला तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची दिली धमकी, जाणून घ्या काय आहे कारण

रशियाने भारताला तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करण्याची दिली धमकी, जाणून घ्या काय आहे कारण
Russia Threatens India
Russia Threatens IndiaSaam Tv

Russia Threatens India: युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जगापासून एकाकी पडलेला रशिया भारतावर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये (FATF) सहकार्य करण्यासाठी दबाव आणत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, रशियाने म्हटले आहे की, जर भारताने रशियाला एफएटीएफच्या 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट होण्यापासून वाचवले नाही, तर ते भारतासोबतचे संरक्षण आणि ऊर्जा करार संपुष्टात आणतील.

'एफएटीएफ' (Financial Action Task Force) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. एफएटीएफच्या ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि दिलेली आर्थिक मदत बंद केली जाते.

Russia Threatens India
Uddhav Thackeray Press Conference: 'नातं जपण्यासाठी मातोश्री प्रसिद्ध', उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा

ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पडद्यामागे रशिया भारतासह ग्लोबल साउथच्या अनेक देशांना एफएटीएफ यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स जूनमध्ये रशियाचा 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समावेश करू शकते, असे बोलले जात आहे.  (Latest Marathi News)

या अहवालात म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या एकाकी पडू नये म्हणून रशिया स्वतःला वाचवण्यासाठी भारताला संरक्षण आणि ऊर्जा करार संपवण्याची धमकी देत ​​आहे.

Russia Threatens India
New Parliament Inauguration Row : अहंकाराच्या विटांनी... संसद भवन उद्घाटन वादात राहुल गांधी यांचीही उडी

वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला रशियन राज्य एजन्सीने भारतीय समकक्षांना इशारा दिला होता की, जर एफएटीएने रशियाला ब्लॅक यादीत किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केले, तर त्याचे ऊर्जा, संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रात खूप गंभीर परिणाम होतील.

नाव न सांगण्याच्या अटीवर रशियन अधिकाऱ्याने ब्लूमबर्गला सांगितले की, "हा एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. ही एक प्रकारे अप्रत्यक्षपणे रशियाकडून देण्यात आलेली धमकी आहे.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com