Goa bound flight Security Threat : खळबळ! गोव्याला २४५ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानात बॉम्बच्या धमकीचा फोन

रशियाहून गोवासाठी उड्डाण भरलेल्या अजूर एअरच्या चार्टर्ड विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Goa bound flight Security Threat
Goa bound flight Security Threat Saam Tv

Goa bound Azur Air charter flight Security Threat : रशियाहून गोवासाठी उड्डाण भरलेल्या अजूर एअरच्या चार्टर्ड विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ हे विमान उजबेकिस्तानला वळवण्यात आले. हे विमान पर्म विमानतळावरून गोव्याकडे जात होते. (Latest Marathi News)

Goa bound flight Security Threat
Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंग यांच्या अडचणीत वाढ? 7 सदस्यीय समिती आरोपांची चौकशी करणार

अजून एअरच्या चार्टर्ड विमानात २३८ प्रवासी आणि ७ क्रू मेंबरसह २४५ जण प्रवास करत होते. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, डाबोलिम विमानतळावरील संचालकांना साधारण साडेबारा वाजता या विमानात कथितरित्या बॉम्ब असल्याचा एक इमेल प्राप्त झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान तात्काळ वळवण्यात आले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, २४५ जणांना घेऊन उड्डाण भरलेले हे विमान पहाटे सव्वाचार वाजता दक्षिण गोव्याच्या (Goa) डाबोलिम विमानतळावर उतरणार होते. अजूर एअरचे विमान (AZV 2463) भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उजबेकिस्तानला वळवण्यात आले होते.

Goa bound flight Security Threat
Air India ला मोठा दणका! ३० लाखांचा दंड, पायलटचा परवाना रद्द, काय आहे प्रकरण?

१२ दिवसांत दुसऱ्यांदा घडली घटना

दरम्यान, मागील १२ दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. रशियाहून भारतात येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. याआधी १० जानेवारीला रशियाची (Russia) राजधानी मॉस्कोहून गोव्याला विमान येत होते. त्याचवेळी सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये इमर्जन्सी उतरवण्यात आलं होतं. मात्र, तपासानंतर विमानात बॉम्ब असल्याची अफवा होती असं स्पष्ट झालं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com