युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला अपघात

युद्धग्रस्त क्षेत्रातून परतत असताना एका वाहणाने झेलेन्स्की यांच्या कारला धडक दिली.
Volodymyr Zelensky
Volodymyr ZelenskySaam TV

Volodymyr Zelensky Car Accident: युक्रेनचे (Ukraine) राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला अपघात झाल्याचे समोर आले आहे. झेलेंस्की युद्धग्रस्त क्षेत्राचा दौरा करत होते, यावेळी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात त्यांना कोणताही ईजा झालेली नाही. झेलेंस्की खारकीव परिसरातून परत येत होते, यावेळी हा अपघात झाल्याची माहिती एका प्रवक्त्याने दिली.

Volodymyr Zelensky
एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? कामगार संघटनेची महामंडळाला नोटीस

फेसबुक पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली. निकिफोरोव्ह म्हणाले की, कीवमध्ये एक प्रवासी वाहनाने राष्ट्रपतींच्या ताफ्याला धडक दिली. झेलेन्स्की यांच्या वैद्यकीय पथकाने प्रवासी वाहनाच्या चालकावर प्राथमिक उपचार केले आहेत, त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Volodymyr Zelensky
सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढवण्याचा ठराव मंजूर

वैद्यकीय पथकाने झेलेंस्की यांची तपासणी केली, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी रात्री, युद्ध परिसरातून झेलेन्स्की यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा अपघातच असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करत अनेक शहरांचे मोठे नूकसान केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com