
युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष अजून सुरुच आहे. युक्रेनमधील (Ukraine) अनेक शहरांवर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले होत आहेत. असाच एक शक्तिशाली हल्ला 16 मार्च रोजी युक्रेनियन शहरातील मारियुपोल (Mariupol) येथील थिएटरवर करण्यात आला होता. रशियन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या थिएटरमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आश्रय घेतला होता. आता या हल्ल्याबाबत नवा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचे वृत्त एपीने दिले आहेत.
युक्रेनियन अधिकार्यांनी यापूर्वी मारियुपोल शहरातील थिएटरवर रशियन हवाई हल्ल्यात सुमारे 300 लोक मारले गेल्याचे सांगितले होते. हवाई हल्ल्यानंतर लगेचच, युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी सांगितले की इमारतीमध्ये 1,300 हून अधिक लोक आश्रय घेत होते. पण आता एपीच्या अहवालात आधीच्या अंदाजापेक्षा दुप्पट मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नागरिकांवरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.
एपीने तपास करून पुरावे गोळा केले
16 मार्च रोजी थिएटरमध्ये जे घडले होते, ते एपीने तपासात पुन्हा बदलले आहे. यासाठी हल्ल्यातून बचावलेले 23 लोक, बचाव पथक आणि आश्रय घेतलेल्या लोकांशी बोलण्यात आले आहे. AP या वृत्तसंस्थेने आपल्या संबंधित इमारतीचे 3D मॉडेल बनवले होते. थिएटरच्या दोन मजल्यांचे आराखडे, आत घेतलेले फोटो आणि व्हिडिओ, तसेच तज्ञांचे म्हणणे देखील त्यात समाविष्ट केलेले आहे.
रशियन सैन्याने केला होता हवाई हल्ला
मात्र, या घटनेत ठार झालेल्यांची नेमकी संख्या कळणे अशक्य असल्याचे एपीचे म्हणणे आहे. एपीचा तपास रशियन दाव्याचे खंडन करतो की थिएटर युक्रेनियन सैन्याने पाडले होते किंवा ते युक्रेनियन लष्करी तळ म्हणून बांधले गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी युक्रेनियन सैनिकांना इमारतीत पाहिले नव्हते. रशियन हवाई हल्ल्यात थिएटर नष्ट झाल्याचा संशय एकाही व्यक्तीला नाही.
थिएटरला बॉम्ब शेल्टर बनवण्यात आलं होतं
मार्चच्या सुरुवातीला रशियन सैन्याने मारिओपोलमध्ये वेढा घातला. हे नाट्यगृह प्रशासनाकडून लोकांसाठी बॉम्ब थिएटर म्हणून खुले करण्यात आले. हे त्याचे आकारमान, त्याच्या मजबूत भिंती आणि त्याचे मोठे तळघर लक्षात घेऊन केले गेले. बॉम्बस्फोटाच्या सुमारे एक आठवडा आधी, थिएटरच्या सेट डिझायनरने हवाई हल्ले रोखण्याच्या आशेने बाहेरील फुटपाथवर काही व्यक्ती रंगवल्या होत्या. रशियन सैन्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी डिझायनरने अजूनही काही चिन्ह तयार केली होती, जी सॅटेलाईट द्वारे सहज पाहता येतील.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.