रशियाने Facebook, Twitter आणि Telegramला ठोठावला दंड; जाणून घ्या कारण

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) सध्या सरकार कठोरतेने वागत आहे. जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे सुरक्षेबाबत संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
रशियाने Facebook, Twitter आणि Telegramला ठोठावला दंड; जाणून घ्या कारण
रशियाने Facebook, Twitter आणि Telegramला ठोठावला दंड; जाणून घ्या कारणSaam TV

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) सध्या सरकार कठोरतेने वागत आहे. जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे सुरक्षेबाबत संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भारतात अलीकडेच भारत सरकार (Indian Governmen) आणि ट्विटर (Twitter) यांच्यात संघर्ष झाला. भारतानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक (Facebook), ट्विटर आणि टेलिग्रामला रशियात मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. रशियाच्या एका न्यायालयाने मंगळवारी म्हटले की त्यांनी बेकायदेशीर सामग्री न काढल्याबद्दल अमेरिकन मीडिया कंपनीने फेसबुक, ट्विटर आणि मेसेजिंग अॅप टेलीग्रामला दंड ठोठावला आहे.

रशियाने Facebook, Twitter आणि Telegramला ठोठावला दंड; जाणून घ्या कारण
अफगाणिस्तानात दोन भारतीयांचं अपहरण; एक पळाला तर दुसरा ताब्यात

कोणाला किती दंड ठोठवला?

टागांस्की जिल्हा न्यायालयाने माहिती दिली की फेसबुकला पाच प्रकरणांमध्ये एकूण सुमारे 2.12 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर ट्विटरला दोन प्रकरणांमध्ये एकूण 50.49 लाख रुपये दंड भरावा लागला आहे. न्यायालयाने मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर 90.88 लाख रुपये दंडही ठोठावला आहे. फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामने अद्याप या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाने इंटरनेटवर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने कठोर पावले उचलून परदेशी इंटरनेट कंपन्यांना त्यांच्या देशात पूर्णवेळ कार्यालये उघडणे बंधनकारक केले आहे. कंपन्यांनी त्यांच्या प्रदेशातील रशियन नागरिकांशी संबंधित डेटा गोळा करणे आवश्यक आहे.

गुगललाही दंड ठोठावण्यात आला आहे.

14 सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या एंटीट्रस्ट नियामकाने गुगलवर जबरदस्त दंड ठोठावला आहे. अहवालानुसार, गुगलने मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप मार्केटमध्ये बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 207.4 अब्ज वॉन एवढा Google ला दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 13.02 अब्ज रुपयांच्या बरोबरीची आहे. त्याचबरोबर गुगलने यावर आक्षेप घेतला आहे आणि या दंडाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. गुगलने दक्षिण कोरियावर बदनामीचा आरोप केला.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com