Salman Rushdie: लेखक सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर; डोळे गमावण्याचा धोका

रश्दी यांच्यावर हल्ला झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
Salman Rushdie
Salman RushdieSaam Tv

Salman Rushdie Health Update: प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये (New York) एका अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. या चाकू हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. अनोळखी व्यक्तीने थेट मंचावर येऊन त्यांच्यावर प्राणघातक चाकू हल्ला केला आहे. रश्दी हे कार्यक्रमात बोलताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. रश्दी यांच्यावर हल्ला झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, न्यूयॉर्कमधून सलमान रश्दी यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे. रश्दी यांच्यावर अनेक तास शस्त्रक्रिया चालली, त्यानंतर सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता आहे. सध्या ते धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान रश्दी यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हे देखील पाहा -

कोण आहेत सलमान रश्दी?

सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचा जन्म १९ जून १९४७ मध्ये मुंबईत झाला. त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. रश्दी यांच्यावर हल्ला करणारा अनोळखी व्यक्ती कोण होता, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच हल्लेखोर व्यक्तीला अटक केल्याचंही अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही.

Salman Rushdie
Thane: कल्याणफाटा जवळील इमारतीचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

दरम्यान, रश्दी हे 'द सॅटिनिक व्हर्सेस' आणि 'मिडनाइट चिल्ड्रेन' या पुस्ककामुळे चर्चेत आले. त्यांचे 'मिडनाइट चिल्ड्रेन' या पुस्तकानेही त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. त्या पुस्तकामुळे त्यांना १९८१ साली बुकर पुरस्कार मिळाला. दरम्यान, त्यांच्या 'द सॅटिनिक व्हर्सेस' या पुस्तकामुळे इराणचे धार्मिक नेते रुहोल्ला खोमैनी यांनी रश्दी यांच्याविरोधात फतवा काढला होता. त्यामुळे रश्दी हे अनेक वर्ष भूमिगत राहावं लागलं होतं. भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकी लेखक सलमान रश्दी हे गेल्या २० वर्षांपासून ते अमेरिकेत राहतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com