SAMSUNG : भारतात १४ जुलैला लॉंच होणार Galaxy M13 सीरिज, वाचा सविस्तर माहिती

सॅमसंगच्या दोन्ही डिवाईसमध्ये 12GB रॅमची सुविधा असणार आहे.
Samsung New Smartphones
Samsung New Smartphonessaam tv

सॅमसंग कंपनीने Galaxy M13 स्मार्टफोन सीरिजला लॉंच करण्याची तारीख घोषीत केली आहे. कंपनी १४ जुलैला भारतात Galaxy M13 4G आणि Galaxy M13 5Gला लॉंच करणार आहे. अधिकृत घोषणा करण्यापूर्वी सॅमसंगने Samsung Galaxy M13 5G आणि Galaxy M13 च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सबाबत पुष्टी केली आहे. दरम्यान, भारतात या दोन्ही डिवाईसची (Samsung) किंमत १५ हजार रुपयांहून कमी असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की, Redmi Note 11, Moto G52, Realme 9i, Poco M4 आणि इतर काही स्मार्टफोनला हे दोन्ही डिवाईस टक्कर देणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही डिवाईसमध्ये 12GB रॅमची सुविधा असणार आहे.

Samsung New Smartphones
COVID 19 Vaccine Booster: कोरोना लसीच्या बुस्टर डोसबाबत सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या सविस्तर

Galaxy M13 4G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

अॅमेझॉन इंडियाच्या एका मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार,हा स्मार्टफोन कमीत कमी दोन कलर मध्ये लॉंच केला जाणार आहे. ग्रीन आणि डार्क ब्लू या कलरमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. Galaxy M13 4G च्या मागच्या बाजुला ट्रीपल कॅमेरा सेटअप असणार आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर असणार आहे. तसेच Galaxy M13 4G मध्ये 6000MAH ची बॅटरी असणार आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

Galaxy M13 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

Galaxy M13 5G या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहेत. कंपनीनं कॅमेरा सेन्सरबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली नाहीये. या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर असणार आहे. गॅलेक्सी M13 5G मागच्या बाजूला असलेल्या ड्युअक कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. तसेच 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यासोबतच 5000 MAH ची बॅटरी या फोनमध्ये असणार आहेत. Samsung Galaxy M13 5G च्या सोबत 11 5G बॅंडलाही सपोर्ट देणार. गॅलेक्सी M13 5g मध्ये 6.5 इंच एवढा HD+ डिस्प्ले असणार आहे. तसेच गॅलेक्सी M13 5G एक मीडियाटेक डायमेंशन 700 SoC पॅक करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com