CBI, ED, NCB ही तीन 'चिलखतं' काढून आमच्यावर वार करा - संजय राऊतांचं भाजपला आवाहन

2014 साली हिंदुत्ववादाचा पावलो पावली विश्वासघात करणारे कोण? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
CBI, ED, NCB ही तीन 'चिलखतं' काढून आमच्यावर वार करा - संजय राऊतांचं भाजपला आवाहन
भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे, हे पवार साहेबांना २५ वर्षांपुर्वीच कळलं होतं - संजय राऊतSaam Tv

नवी दिल्ली: गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात दौऱ्यादरन्यान शिवसेनेवर टीका केली होती. त्या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहांचं वक्तव्य असत्याला धरून आहे असं म्हणत आम्हाला अमित शाह पुण्यात बोलल्याची दया आली आणि आश्चर्य वाटतं असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. आमच्या सारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला भाजपने (BJP) बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत 2014 साली शिवसेनेला (Shivsena) सत्तेपासून दूर करा हे सांगणारे कोण होते? 2014 साली हिंदुत्ववादाचा पावलो पावली विश्वासघात करणारे कोण? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut appeals to BJP to remove CBI, ED, NCB and attack us)

हे देखील पहा -

शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कोणी कट-कारस्थान केलं असा आरोप करत याचा खुलासा करावा असं आवाहन करत पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत बोला असं संजय राऊत म्हणाले आहेत. केंद्र सरकारवर हल्ला करताना राऊत म्हणाले की, "सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही तीन-तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ती चिलखलं काढून आमच्याशी लढा, आम्ही छातीवर वार झेलतो असं राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे शिवसेना होती म्हणून भाजपचे १०५ आमदार निवडून आले असं म्हणत राजीनामा देऊन वेगळे लढून दाखवा, आम्हीही राजीनामा देऊ, कुणाचे किती आमदार येतात हे पाहु असंही राऊत भाजपला म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com