कर्नाटक संस्कृत विद्यापीठाला मिळणार स्थायी कॅम्पस; मुख्यमंत्री बोम्मई करणार पायाभरणी

या निर्णयाचं सर्व स्थरातून कौतूक होत आहे.
कर्नाटक संस्कृत विद्यापीठाला मिळणार स्थायी कॅम्पस; मुख्यमंत्री बोम्मई करणार पायाभरणी
कर्नाटक संस्कृत विद्यापीठाला मिळणार स्थायी कॅम्पस; मुख्यमंत्री बोम्मई करणार पायाभरणी Saam TV

कर्नाटक : कर्नाटक संस्कृत विद्यापीठाला (Karnataka Sanskrit University) 10 वर्षांच्या संघर्षानंतर मगडी, रामनगर येथे कायमस्वरूपी कॅम्पस मिळणार आहे. मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) उद्या विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. 320 कोटी रुपये खर्चून 100 एकर जागेवर विद्यापीठ उभारले जाणार आहे. 2010 मध्ये विद्यापीठाला मान्यता देण्यात आली होती आणि भूसंपादनाच्या मुद्द्यांमुळे कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्यास विलंब झाला होता. विद्यापीठात सध्या 2 घटक संस्कृत महाविद्यालये, 10 अनुदानित संलग्न महाविद्यालये आणि 9 विनाअनुदानित संलग्न महाविद्यालये समाविष्ट आहेत. या निर्णयाचं सर्व स्थरातून कौतूक होत आहे.

2011 मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मगडी तालुक्यातील थिप्पासंद्रा गावात 100 एकर जमीन मंजूर करण्याची शक्यता होती. परंतु तेव्हा अनेक स्थानिकांना विद्यापिठाला विरोध केला होता. तेव्हापासून या कामाला मुहूर्त लागत नव्हता. त्यावेळी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की विद्यापिठासाठी मगडी हे ठिकाण निवडण्यामागे कोणतेच विशेष कारण नाही. महसूल विभागाने कॅम्पससाठी जागा देण्याचे मान्य केले होते, असेही ते म्हणाले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com