SBI New Rules: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम

SBI Locker Rules: या निर्णयाचा देशातील कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे.
SBI Bank Locker New Rules
SBI Bank Locker New Rulessaam tv

SBI Bank Locker New Rules: एसबीआय (SBI) बँकेत खाते असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हीही एसबीआयमध्ये (State Bank Of India) खाते उघडले असेल तर ३० जून ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 30 जूनपासून बँक महत्त्वाच्या नियमांमध्ये (Bank Locker Rules) बदल करणार आहे. याचा देशातील कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे.

कोणत्या नियमात होणार बदल

स्टेट बँक ऑफ इंजिया 30 जूनपासून बँक लॉकर्सच्या नियमात बदल करणार आहे. यासंदर्भात बँकेने एक अॅढव्हायजरी जारी केली आहे. यात इंटरनेटवरील लॉकर धारकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेकडून याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

SBI Bank Locker New Rules
New Parliament Building : नागपुरी सागवानापासून ते राजस्थानच्या लाल खडकापर्यंत, देशाच्या विविधतेने नटले आहे नवीन संसद भवन

एसबीआयने ट्वीटमध्ये काय म्हटले?

बँकेने ग्राहकांना लॉकर करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याचं आवाहन केलं आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले की 'प्रिय ग्राहक, सुधारित लॉकर कराराच्या सेटलमेंटसाठी कृपया तुमच्या शाखेला भेट द्या. तुम्ही आधीच अपडेटेड करारावर स्वाक्षरी केली असेल तरीही तुम्हाला सप्लीमेंट्री करार अंमलात आणणे आवश्यक आहे.' SBI व्यतिरिक्त बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना निर्धारित तारखेपर्यंत सुधारित लॉकर करारांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही आवाहन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांना आवाहन केले आहे. आरबीआयने 23 जानेवारी 2023 रोजी ग्राहकांना लक्षात घेऊन एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व बँकांना लॉकरशी संबंधित नियम आणि करारांची माहिती द्यावी लागेल. (Breaking News)

SBI Bank Locker New Rules
Kannad News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अन्नाची नासाडी! Video पाहून अस्वस्थ व्हाल, जबाबदार कोण?

ग्राहकांना कधी मिळेल भरपाई

सुधारित नियमांनुसार आग, चोरी, घरफोडी, दरोडा, बँकेचा निष्काळजीपणा किंवा कर्मचार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास बँकेकडून त्याची नुकसानभरपाई दिली जाईल. हे लक्षात घ्या की ही भरपाई लॉकरच्या वार्षिक किरायाच्या 100 पट असेल. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com