Delhi School : शाळकरी मुलांची सुट्टी संपली; दिल्लीतील शाळा आजपासून सुरु

दिल्लीत पहिल्या टप्प्यात आजपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
Delhi School : शाळकरी मुलांची सुट्टी संपली; दिल्लीतील शाळा आजपासून सुरु
Delhi School : शाळकरी मुलांची सुट्टी संपली; दिल्लीतील शाळा आजपासून सुरुविहंग ठाकूर

दिल्ली : आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्लीतील शाळाDelhi Schools open आजपासून टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत पहिल्या टप्प्यात आजपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. Schools in Delhi start from today

हे देखील पहा-

कोरोना काळCorona Periode सुरु झाला तेंव्हापासून संपुर्ण देशातील शाळा जवळपास दिडवर्षाहून जास्त काळ बंदच आहेत. मागील काही महिण्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव ज्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये कमी आहे आणि ज्या ठिकाणी एकही कोरोना रुग्णCorona Patient नाही, जे गाव कोरोना रुग्ण विरहीत आहेच शिवाय कोरोना फ्री झाल्यावरती ज्या गावामध्ये एक महिणाभर जर कोरोना रुग्ण सापडला नाही तरच त्या गावातील शाळा सुरु करायचा निर्णय महाराष्ट्र शासणाने घेतला होता यावेळी काही भागात शाळा सुरु झाल्या होत्या मात्र हा अपवाद सोडता महाराष्ट्रामधीलMaharastra शाळाही दिड वर्षापासून बंदच आहेत.

मात्र दिल्लीच्याDelhi मुलांची मात्र आता सु्ट्टी संपली असून शाळा सुरु झाली आहे. 'राउज एव्हिन्यू सर्वोदय विद्यालयाने''Rouge Avenue Sarvodaya School ९ ते १२ इयत्तांचे वर्ग कोविड नियमांचे पालन करून सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून ते प्रत्यक्षात सुरु देखील करण्यात आले. शाळा उघडल्यानंतर शाळेत पहिल्या दिवशी उपस्थिती कमी होती. या शाळेच्या ९ ते  १२ वीचा एकूण पट ६०० आहे मात्र ६०० विद्यार्थ्यांपैकी शाळेत १५० विद्यार्थी उपस्थित होते.

Delhi School : शाळकरी मुलांची सुट्टी संपली; दिल्लीतील शाळा आजपासून सुरु
तालिबानला फ्रान्सनधून विरोध; आयफेल टॉवरवर झळकले नॉर्दन अलायन्सचे झेंडे

मात्र आजपासून क्लासरूम मध्ये प्रत्यक्ष शिकविण्यासाठी शिक्षकांनी सुरुवात केल्यामुळे इतके दिवस शाळांपासून लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र ऑनलाईन शाळेपेक्षा प्रत्येक्ष शाळाच बरी अशा प्रतिक्रिया दिल्या असून अनेक दिवसांपासून घरामध्ये कोंडून असणारे विद्यार्थी शाळा सुरु झाल्यामुळे आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com