Viral : चुकून एक्सीलेटर फिरवला अन् स्कूटीवरून धाडकन आदळली तरुणी, VIDEO व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील आहे.
Scooty Girl Viral Video
Scooty Girl Viral VideoInstagram

Scooty Girl Viral Video : मुलींना स्कूटी चालवायला किती आवडते हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. पण काही मुली स्कूटी चालवण्यात फारशा एक्सपर्ट नसतात. एखादा व्यक्ती अचानक समोर आला तर बहुतेक वेळा मुली गोंधळून जातात. एक्सीलरेटर कधी आणि कसा नियंत्रित करायचा हे त्यांना समजत नाही. परिणामी अनेकदा त्या स्कूटीवरून पडतात किंवा समोरच्याला पाडतात. (Scooty Girl Incident At Petrol Pump Funny Viral Video)

Scooty Girl Viral Video
King Cobra Video : कोब्रासोबत मस्ती तरुणाला पडली भारी; शेपटी धरताच घडलं असं काही...

तुम्ही इंटरनेटवर फनी स्कूटी गर्ल्स नावाने व्हिडीओ सर्च केले तर तुम्हाला एकापेक्षा अधिक मजेदार व्हिडीओ (Viral Video) पाहायला मिळतील. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून या तरुणीला स्कूटी चालवण्याचा परवाना नेमका कुणी दिला? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ (Social Media) एका पेट्रोल पंपावरील आहे. ज्यात एक महिला स्कूटीमध्ये पेट्रोल भरताना दिसूत येतेय. या महिलेच्या पाठीमागे असलेल्या एका दुसऱ्या स्कूटीजवळ एक व्यक्ती आणि मुलगी उभी आहे. समोरच्या महिलेने पेट्रोल भरल्यानंतर ही मुलगी पेट्रोल भरण्यासाठी स्कूटी घेऊन पुढे येते. मात्र, अचानक तिच्याकडून स्कूटीचा एक्सीलरेटर वाढतो आणि स्कूटी थेट समोरील महिलेच्या स्कूटीला धडक देते. (Scooty Girl Funny Viral Video)

ही धडक इतकी जबरदस्त असते, की यामध्ये समोरील स्कूटीवर बसलेली महिला धाडकन खाली पडते. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुद्धा झटपट बाजूला होताना दिसत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील एका छोट्याशा चुकीमुळे दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असली तरी ही घटना अधिक गंभीर असू शकते.

दरम्यान, हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, अशा लोकांना परवाना कसा मिळतो?. एका दुसऱ्या यूजरने लिहले आहे की मुली स्कूटी चालवत असताना त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर rvcjinsta नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 3 लाख लोकांनी लाईक केले आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com