IPC Section 498A : दुसरी पत्नी पतीविरोधात छळवणुकीची तक्रार करू शकत नाही: हायकोर्ट

Second wife case filed against husband under Section 498A of IPC : दुसरी पत्नी आपल्या पतीविरोधात छळवणुकीची तक्रार करू शकत नाही, असा निर्णय कर्नाटक हायकोर्टानं नुकताच दिला.
Second wife case filed against husband under Section 498A of IPC Latest News
Second wife case filed against husband under Section 498A of IPC Latest News SAAM TV

Second wife case filed against husband under Section 498A of IPC : दुसरी पत्नी आपल्या पतीविरोधात छळवणुकीची तक्रार करू शकत नाही, असा निर्णय कर्नाटक हायकोर्टानं नुकताच दिला. या प्रकरणात निकाल देताना हायकोर्टानं कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द करताना पतीची निर्दोष मुक्तता केली. (Latest Marathi News)

न्यायमूर्ती एस. रचैया यांच्या एकल पीठाने यासंदर्भात निर्णय दिला. दुसऱ्या पत्नीकडून पती (Husband And Wife) आणि सासरच्या मंडळीविरोधात दाखल केलेली तक्रार सुनावणीयोग्य नाही, असे पीठाने आदेशात म्हटलं आहे. तक्रारदार महिला ही संशयित आरोपीची दुसरी पत्नी आहे. त्यामुळे आयपीसीच्या कलम ४९८ ए (विवाहित महिलेसोबत क्रूरता) अंतर्गत आरोपीला दोषी ठरवण्याचा निर्णय रद्द करत आहोत. कारण हे लग्न कायदेशीर नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

Second wife case filed against husband under Section 498A of IPC Latest News
Chanakya Niti On Relationship : या सवयींमुळे पती-पत्नीच्या नात्यात येतो दूरावा, नातं टिकवण्यासाठी आजच करा हे बदल

काय आहे प्रकरण?

तुमकुरू जिल्ह्यातील विट्टावतनहल्ली येथील रहिवासी कंथाराजूच्या विरोधात एका महिलेने (Woman) पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कंथाराजू याची दुसरी पत्नी असून, पाच वर्षे एकत्र राहिलो. आम्हाला एक मूल आहे, असा दावा महिलेने केला होता. लग्नानंतर काही काळानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. पॅरालिसिसमुळं कामे करू शकत नव्हती. त्यानंतर पतीनं त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने मानसिक त्रास देणे सुरू केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते.

Second wife case filed against husband under Section 498A of IPC Latest News
Husband Wife Relation: लग्नानंतर पती-पत्नीने 'या' गोष्टी आर्वजून कराव्यात!

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) कारवाई केली. हे प्रकरण तुमकुरूच्या कोर्टात पोहोचले. कोर्टाने सुनावणीनंतर १८ जानेवारी २०१९ रोजी पतीला दोषी ठरवले. ऑक्टोबर २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात आरोपीने २०१९ मध्ये हायकोर्टात धाव घेत फेरविचार याचिका दाखल केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला

हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या दोन खटल्यांतील निकालाचा दाखला दिला. जर पती आणि पत्नीमधील लग्न अमान्य आणि ते अर्थशून्य असेल तर, आयपीसीच्या कलम ४९८ अ अंतर्गत गुन्हा होत नाही, असं सुप्रीम कोर्टानं या दोन्ही खटल्यांच्या निकालात स्पष्ट सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com