
New Delhi: नव्या संसद भवनात हजारो वर्ष जुने असलेले प्रतीक सेंगोल स्थापन केलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल घोषणा केली आहे. अभ्यासकांच्या मते, चोळ साम्राज्यात सत्तेचे हस्तांतर व्हायचं, त्यावेळी सेंगोलचं हस्तांतर नव्याने विराजमान होणाऱ्या राजाकडे सोपवलं जात होतं, असा या सेंगोलचा इतिहास आहे. (Latest Marathi News)
१४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सेंगोल मिळाले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमातही सदर प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेंगोल स्वीकारणार आहे.
सेंगोलला राजदंड देखील म्हटलं जातं. या राजदंडाचा वापर चोळ साम्राज्यात झाला होता. चोळ साम्राज्यात एखादा राजा त्याचा उत्तराधिकारी घोषित करत होता, तेव्हा सत्ता हस्तांतरण करताना सेंगोल दिले जात होते.
सेंगोल देण्याची परंपरा ही तमिळनाडू आणि इतर दक्षिण राज्यात न्यायप्रिय मानली जात होती. काही इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे की, मौर्य आणि गुप्त वंशाच्या काळातही सेंगोलचा वापर केला जात होता.
देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात भारताचे वॉइसरॉय लॉर्ड माउंटबेटन हे सत्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करू इच्छित होते. या टप्प्यात ब्रिटिशांकडून भारताकडे सत्ता हस्तांतरित करण्यात येणार होती. त्यावेळी कागदपत्रांचे काम पूर्ण झालं होतं. मात्र, सत्ता हस्तांतरित करण्याचं प्रतिक काय असा प्रश्न उपस्थित झाला होता.
लॉर्ड माउंटबेटन यांच्या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नव्हतं. त्यानंतर पंडित जवाहलाल नेहरू हे माजी गव्हर्नर जनरल सी राज गोपालचारी यांच्याकडे गेले. तमिळनाडूचे सी राज गोपालाचारी हे भारताचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून होते. त्यांनी पंडित नेहरू यांना सेंगोल प्रतिकाचं नाव सुचवलं आहे.
चोळ साम्राज्याची संस्कृती विलक्षणीय होती. चोळ साम्राज्यात सामर्थ्याचे, वैधतेचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून सेंगोल हे राजवटीचे प्रतीक म्हणून उदयास आले. सेंगोल प्रतीक हे वारसा आणि परंपरेचे प्रतीक म्हणून पूजलं जात होतं. सेंगोल तमिळ संस्कृतीच्या समृद्ध इतिहासाचं सन्मान करते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.