काँग्रेसचे बडे नेते शिवकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

आज दुपारी शरद पवारांचे बंगळूरू विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवकुमारांनी त्यांची भेट घेतली. याबाबत डी. के. शिवकुमार यांनी स्वत: ट्विटरवरून माहिती दिली आहे.
DKShivakumar/Sharad Pawar
DKShivakumar/Sharad Pawar@DKShivakumar

बंगरुळू : कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार असून याच पार्श्वभूमीवर कर्नाटकसह देशभरातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आज कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या बंगळूरूमधील कार्यालयाचं उद्घाटन केलं. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना चांगलच उधाण आलं आहे.

आज दुपारी शरद पवार यांचे बंगळूरू विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर शिवकुमारांनी त्यांची भेट घेतली. याबाबत डी. के. शिवकुमार यांनी स्वत: ट्विटरवरून माहिती दिली आहे. या भेटीचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याचं NCP कडून सांगितलं जात आहे.

दरम्यान, शिवकुमार हे काँग्रेसमधील (Congress) एक मोठे नेते असून सध्या त्यांच्यामागे देखील ईडीचा ससेमिरा लागला असताना त्यांनी पवारांच जल्लोषात केलेलं स्वागतामुळे अनेक राजकीय विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com