Ravish Kumar : वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांचा राजीनामा; प्रदीर्घ वर्षानंतर एनडीटीव्हीची साथ सोडली

एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.
ravish kumar
ravish kumar saam tv

Ravish Kumar News : एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. रविश कुमार यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारल्यामुळे एनडीटीव्ही इंडियामधून बाहेर पडणार आहे. कंपनीने देखील रविश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला असून तो तात्काळ प्रभावानं लागू होईल असं सांगितलं आहे. (Latest Marathi News)

ravish kumar
CNG दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? गठीत समितीकडून सरकारला शिफारशी सादर

रविश कुमार हे एनडीटीव्ही इंडिया (हिंदी) वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादकपदाची धुरा सांभाळायचे. रविश कुमार हे अनेक दशकापासून एनडीटीव्ही इंडिया (हिंदी) वृत्तवाहिनीत कार्यरत होते. रविश कुमार यांनी वृत्तवाहिनीवर अनेक कार्यक्रमात सुत्रसंचालन केले.

या कार्यक्रमात हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमचा सामावेश आहे. रविश कुमार यांना पत्रकारितेच्या योगदानासाठी रामनाथ गोयंका उत्कृष्टता पत्रकारिता (Journalism) पुरस्कार आणि २०१९ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ravish kumar
Zombie Virus : जगावर नव्या व्हायरसचं संकट; ४८,५०० वर्षांपूर्वीचा झोम्बी विषाणू पुन्हा आला

रविश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर एनडीव्ही समूहाच्या अध्यक्षा सुपर्णा सिंह यांना प्रतिक्रिया दिली आहे. सुपर्णा सिंह म्हणाल्या, 'रविश कुमार यांच्या सारखे कमी पत्रकार असून ते लोकांना प्रभावित करू शकतात. त्यांची विशेषता लोकांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते. रविश कुमार हे एनडीटीव्हीचे अविभाज्य भाग होते. एनडीटीव्हीसाठी त्यांचं योगदान अधिक आहे. आम्हाला खात्री आहे की, रविश कुमार हे त्यांच्या नवीन इनिंगमध्येही यशस्वी होतील'.

दरम्यान, रविश कुमार यांनी राजीनामा देण्याआधीच एक दिवस आधी एनडीव्हीचे कार्यकारी सह-अध्यक्ष प्रणव रॉय यांनी देखील संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. रविश कुमार यांच्या राजीनाम्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर आज, बुधवारी वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी कंपनीला मेल पाठवून राजीनामा दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com