
kissing Video : गुन्हेगारी विश्वातील आजवर तुम्ही अनेक भयानक घटना पाहिल्या असतील. यात सर्वात जास्त खतरनाक म्हणजे सीरियल किलर्स. सीरियल किलर्स असलेले अनेक माथेफेरू पोलिसांनी पकडले आहेत. मात्र सध्या एका सीरियल किसरची सर्वत्र दहशत पसरली आहे. हा सीरियल किसर महिला दिसली की तिचं चुंबन घेत आहे. या तरुणाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. त्याने केलेल्या या किळसवाण्या कृत्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Bihar News)
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओ हा बिहारमधील आहे. बिहारच्या जमुई येथील एका हॉस्पिटल बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हॉस्पिटल बाहेर एका व्यक्तीशी फोनवर बोलत आहे. हॉस्पिटल बाहेर आपल्याला कोणी अचानक कीस करेल असा विचार देखील या महिलेच्या मनात नसेल. पुढे फोनवर बोलताना अचानक हा तरुण येतो. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून तो सरळ महिलेवर कीसचा हल्ला करतो.
महिलेला जोरात पकडून हा तरुण तिला किस करत आहे. महिला फोनवर बोलत असताना अचानक ही घटना घडते. त्यामुळे तिला काय सुरू आहे हे काहीच समजत नाही. ती गोंधळून जाते. महिलेला काही समजण्याआधीच हा तरुण तेथून पळ काढतो. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर तरुणाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
बिहारमध्ये नेहमीच गुन्हेगारीच्या अनेक विचित्र घटना घडत असतात. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या देखील अनेक भयानक घटना समोर आल्या आहेत. अशात आता या सीरियल किसरमुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेला आता २४ तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्याप हा तरुण फरार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.