धक्कादायक !10 महिन्यांच्या बालिकेवर नोकरानेच केला बलात्कार

उत्तर प्रदेशात अवघ्या १० महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे.
धक्कादायक !10 महिन्यांच्या बालिकेवर नोकरानेच केला बलात्कार
धक्कादायक !10 महिन्यांच्या बालिकेवर नोकरानेच केला बलात्कारSaam Tv

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशात अवघ्या १० महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार घरातल्याच एका नोकराने केल्याचे पोलीस तपासात कळले आहे. या बालिकेवर अतिअत्याचार केल्यामुळे तिच्या नाजूक अंगांना जबरदस्त हानी पोहोचली आहे. या चिमुरडीला किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात लहान मुलांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या विभागात भरती करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

लखनऊ मधील सादतगंज भागात ही घटना घडली आहे. बालिकेची आई स्वयंपाकघरात काम करत असताना तिला मुलीच्या जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकायला येत होता. ती मुलीच्या खोलीकडे धावत गेली असता तिला खोलीमध्ये सन्नी नावाचा त्यांचा नोकर आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आला होता. मुलीच्या आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, तो तिला हिसका मारून पळून गेला आहे. यानंतर बालिकेच्या घरच्यांनी पोलिसामध्ये तक्रार दिली आहे. सादतगंज पोलिसांनी वेळ न लावता तपास सुरू केला आहे. आणि सन्नीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सन्नीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच बलात्कारासाठीच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धक्कादायक !10 महिन्यांच्या बालिकेवर नोकरानेच केला बलात्कार
मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यावर तिची अवस्था बघून डॉक्टर जे.डी.रावत यांनी तिच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरवात केली. बलात्कारामुळे बालिकेच्या गुप्तांगाला जबरी इजा झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. बालिका शुद्धीवर असली, तरी तिला प्रचंड वेदना होत असल्याचे डॉ.रावत यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com