धक्कादायक! मध्यप्रदेशात दुमजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा जागीच मृत्यू
Indore Fire NewsSaam Tv

धक्कादायक! मध्यप्रदेशात दुमजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा जागीच मृत्यू

इंदौरमध्ये ही घटना शनिवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी बचाव मोहिम सुरु आहे.

इंदौर: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदौर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत शनिवारी पहाटे ५ च्या दरम्यान एका दुमजली इमारतीला भीषण आग (fire) लागली. या आगीत सात जणांचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथकाने बचाव मोहिम सुरु केली आहे. या आगीतून ९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. (Indore Fire News)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Indore Fire News
नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, सात जणांचा मृत्यु

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे इमारतीतील पाच जणांना मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर इतर ११ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली आणि आधी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आग (Fire) लागलेल्या इमारतीचे मालक अन्सार पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रत्येक मजल्यावर फ्लॅट असलेल्या इमारतीमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे बसवण्यात आली नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Indore Fire News)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.