वडिलांच्या अंत्ययात्रेत सात मुलं आपापसात भिडली, लाथा-बुक्क्यांनी केली हाणामारी!

नारियाला गावातील ८५ वर्षांच्या वृद्ध वडिलांचं निधन झाल्यानंतर सात मुलामंध्ये तुंबळ हाणामारी
वडिलांच्या अंत्ययात्रेत सात मुलं आपापसात भिडली, लाथा-बुक्क्यांनी केली हाणामारी!
Family conflictsaam tv news

वल्लभगड : कौटुंबिक वादविवादामुळे खून, आत्महत्या करुन जीवन संपवल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पण हरियाणाच्या (Haryana) वल्लभगडमध्ये काहिसं उलट घडलं आहे. नारियाला गावातील ८५ वर्षांच्या वृद्ध वडिलांचं निधन (Death) झाल्यानंतर त्यांच्या सात मुलामंध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या वडिलांना स्मशानात (cemetery) नेत असताना तीनवेळा त्यांच्या (children quarrel) मुलांनी लाथा-बुक्क्यांनी हाणामारी केली. या हाणामारीत तीन मुलं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत कुणीही (Police complaint) तक्रार दाखल केली नाहिये.

Family conflict
अखेर विराज सापडला; 'असा' होता बदलापूरच्या चंदेरी गडावरचा २२ तासांचा थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारियाला गावातील एका वृद्ध ग्रामस्थाचं बुधवारी निधन झालं. मृत्यू झालेल्या व्यक्तीला सात मुलं आहेत. ती सातही मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वडिलांचं निधन झाल्यानंतर मोठ्या मुलानं त्यांच्या अंत्यसंस्करानंतर जेवणाचा मोठा कार्यक्रम करणार असल्याचं त्याच्या भावांना सांगितलं. मात्र, इतर सहा मुलांनी मोठ्या मुलाला विरोध केल्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नातेवाईकांनी वादविवाद करणाऱ्या मुलांना शांत केले. याचदरम्यान, कुटुंबातील सदस्य पार्थिव स्मशानभूमिकडे घेवून जायला निघाले.परंतु, रस्त्यात जात असताना पुन्हा एकदा मुलांमध्ये वादाची ठिणगी पेटली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर अंत्ययात्रेला निघालेल्या नागरिकांनी पार्थिव रस्त्याच्या बाजुला ठेवून वादविवाद करणाऱ्या मुलांना पुन्हा एकदा शांत केलं. त्यानंतर सगळे स्मशाभूमीवर पोहोचले.

तीन जण रुग्णालयात दाखल

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी मुलांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, हाणामारी झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली आणि पोलिसांच्या साक्षीने अत्यसंस्कार पार पडले. 'याप्रकरणी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तक्रार दाखल केली नाही. तक्रार झाल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाईल. वाद विवाद करणाऱ्यांना पोलीस स्थानकात बोलवंल आहे'.अशी माहिती एसएचओ कुलदीप सिंह यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.