थंडीची लाट ! उत्तर भारतात पारा शून्याच्या खाली, महाराष्ट्रातही हुडहुडी...

राजस्थानमध्ये पारा शून्याच्या खाली !
थंडीची लाट ! उत्तर भारतात पारा शून्याच्या खाली, महाराष्ट्रातही हुडहुडी...
थंडीची लाट ! उत्तर भारतात पारा शून्याच्या खाली, महाराष्ट्रातही हुडहुडी...Saam Tv

नवी दिल्ली : उत्तर-पश्चिम भारतातील थंडीची लाट (Cold Wave) कायम राहणार आहे. डोंगरावर सतत बर्फवृष्टी होत असताना, मैदानी भागात थंडीची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. हरियाणा, पंजाबमध्येही पारा झपाट्याने घसरला आहे. राजस्थानमध्ये दव थेंब बर्फ बनत आहेत, तर मध्य प्रदेशात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डोंगराळ भागात पारा उणेपर्यंत पोहोचला आहे. एकंदरीत संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीच्या कहरात आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितलं की, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट आणि तीव्र शीतलहरीची स्थिती असणार आहेत. पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट राहील आणि त्यानंतर या थंड तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रतही (Maharashtra) मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

IMD ने माहिती दिली दिली आहे की, "पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे."

तर देशामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत थंडीची लाट, आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. २४ डिसेंबरला पंजाबमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ आणि २५ डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये आणि पश्चिम राजस्थानमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या बहुतांश भागात थंडी असून अनेक ठिकाणी किमान तापमान शून्याच्या खाली (Low Temperature) नोंदवले जात आहे. तर, फतेहपूरमध्ये रविवारी रात्रीचे किमान तापमान (उणे १.८ अंश सेल्सिअस) इतके होते. त्याचप्रमाणे करौली येथे (- ०.१ अंश सेल्सिअस) तापमान, सीकर आणि चुरू (- ०.५) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com