संतापजनक: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार!

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीसोबत बलात्कार झाल्याची घटना घडली आहे
संतापजनक: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार!
संतापजनक: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार!Saam Tv

मध्य प्रदेशची Madhya Pradesh राजधानी भोपाळमध्ये Bhopal एका नर्सिंग विद्यार्थिनीसोबत बलात्कार Rape on Nursing Student झाल्याची घटना घडली आहे. आरोपी सुद्धा नर्सिंगचा विद्यार्थी आहे. आरोप आहे की त्याने आधी मुलीला गुंगीचे पदार्थ असलेले अन्न दिले. नंतर तिच्यासोबत बलात्कार केला. यासोबतच त्याने तिचा व्हिडिओही Video बनवला होता आणि त्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल Blackmail करत होता.

निशातपुरा भागातील एका 26 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध मिसळून अन्न दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी Police दिलेल्या माहितीनुसार, आरोपी, नर्सिंगचा विद्यार्थी आहे.

ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली. आरोपी गोविंद अहिरवारने पीडितेला महाविद्यालयात सोडण्यासाठी Drop to collage विचारले होते. पीडित आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला महाविद्यालयात सोडत असताना आरोपीने त्याची कार एका हॉटेल जवळ थांबवली आणि काही खाद्यपदार्थ खरेदी केले होते.

संतापजनक: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार!
पुणे पोलिसांचं कौतुकच... पण पूजा चव्हाण प्रकरणाचं काय ?

यानंतर आरोपी तिला निशाटपुरा येथील भाड्याच्या घरात Rent House घेऊन गेला. त्याने त्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला आणि त्या कृत्याचे चित्रीकरण केले. यानंतर या व्हिडिओद्वारे आरोपीने पीडितेला धमकी देण्यास सुरुवात केली. आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमक्यांमुळे हतबल झालेल्या पीडितेने अलिराजपूर जिल्ह्यातील तिच्या पालकांकडे जाऊन त्यांना सर्व काही घडलेला प्रकार सांगितला.

अलिराजपूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता भोपाळच्या निशातपुरा पोलिस स्टेशनला हस्तांतरित केलं आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या भाड्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, पण तो फरार झाला होता.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गुन्हा केल्यानंतर आरोपी तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​होता आणि सोशल मीडिया साइटवर Social Media site तिचे फोटो आणि व्हिडिओ टाकण्याची धमकीही देत ​​होता.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com