
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (ashok gehlot) यांचे जवळचे मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर एका महिला पत्रकाराने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने बलात्कारासहित मारहाण आणि बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप केला आहे. या आरोपामुळे राजस्थानमधील (Rajstan) राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा गुन्हा दिल्लीच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी जयपूरला हस्तांतरित करण्यात आला आहे. ( Jaipur Latest crime News )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, महिला पत्रकार आणि मंत्री महेश जोशी (Mahesh Joshi) यांचा मुलगा रोहित जोशीची (Rohit Joshi) ओळख फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. 'रोहित जोशीने जवळीकतेचा गैरफायदा घेत नशेत असतानाचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यानंतर रोहित अश्लील व्हिडीओ आणि फोटोच्या आधारावर ब्लॅकमेल करू लागला, असा आरोप पीडित पत्रकार महिलेने केला आहे. सदर प्रकारानंतर रोहित जोशीने मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकी दिली, असाही आरोप देखील पीडित महिलेने केला आहे.
पीडित महिला पत्रकाराने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशीच्या विरोधात बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तसेच 'घरात येऊन मला आणि नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही महिलेने आरोप केला आहे. रोहित जोशीने वारंवार ब्लॅकमेल केल्याचेही सदर पीडित महिलेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी न्याय द्यावा, अशी मदतीची याचना पीडित महिलेने पोलिसांना केली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी एका कथित फोन टॅपिंग (Phone Taping) प्रकरणात मंत्री महेश जोशी आणि अन्य काही जणांना नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात त्यांना १६ मार्च रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.