मथुरेच्या शाही ईदगाह प्रकरणी नवी याचिका दाखल, कोर्टात होणार आज सुनावणी

शाही ईदगाह प्रकरणी आज न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली
Shahi Eidgah Case
Shahi Eidgah Case Saam Tv

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील शाही ईदगाह (shahi eidgah) प्रकरणी आज न्यायालयात (court) नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. शाही ईदगाहची सुरक्षा वाढवावी, हालचालींवर बंदी घालावी आणि सुरक्षा अधिकारी नेमावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग न्यायालयात आज या याचिकेवर (petition) सुनावणी होणार आहे. मथुरेच्या शाही ईदगाहची सुरक्षा वाढवण्यासाठी अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी याचिका दाखल केली आहे.

हे देखील पाहा-

शाही ईदगाहच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सुरक्षा अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर नुकतीच मथुरेच्या शाही इदगाहच्या मागणीबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने मनीष यादव यांची याचिका स्वीकारली आहे. या प्रकरणाची सुनावणी १ जुलै दिवशी न्यायालयात होणार आहे.

Shahi Eidgah Case
धक्कादायक! सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या

याचिकाकर्त्याने श्रीकृष्णाचे वंशज असल्याचा दावा

शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या मनीष यादव यांनी आपण भगवान श्रीकृष्णाचे वंशज असल्याचा दावा केला आहे. वकिल आयुक्त नेमून शाही ईदगाहचे व्हिडीओग्राफी करून अहवाल मागवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शाही इदगाहमध्ये पौराणिक पुरावे आणि पुरातन शिलालेख आहेत, जे ईदगाहमध्ये दफन करण्यात आले आहेत. पौराणिक पुरावे गायब झाले आहेत. ही परिस्थिती न्यायालयासमोर आणणे आवश्यक आहे. याचिकेत मनीष यादव यांनी शंका उपस्थित केली आहे की, आयोग न केल्यास प्रतिवादी हिंदू चिन्हे नष्ट करू शकतात.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com