
Air India Case : एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला दिल्लीतही आणण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बेंगळुरूमधून अटक केली आहे. ही घटना 26 नोव्हेंबर 2022ची आहे, पण एअर इंडियाने 28 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांना याची माहिती दिली होती. यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
आरोपी बराच काळ फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होते. त्यावेळी विमानात बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या शंकर मिश्रा याने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली.
शंकर मिश्रा यांचे शेवटचे लोकेशन बेंगळुरू होते, त्याच आधारे त्याचा शोध सुरू होता. दिल्ली पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, 3 जानेवारी रोजी शंकर मिश्रा याचा मोबाईल फोन बेंगळुरूमध्ये सक्रिय होता. मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. बेंगळुरूपूर्वी दिल्ली पोलिसांनी मुंबईला अनेक पथके पाठवली होती, पण तिथे त्याचा शोध लागला नाही.
या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर आरोपी शंकरला त्याच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं. शंकर मिश्रा हे वेल्स फार्गो कंपनीत उपाध्यक्ष होते. ही कंपनी अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा महामंडळाशी संबंधित आहे.
महिलेला 15 हजार रुपयांची भरपाई दिली होती
याआधी शुक्रवारी महिलेचे काही मेसेज शेअर करत शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी दावा केला होता की पीडितेने कथित कृत्य माफ केलं होतं आणि तक्रार नोंदवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. मिश्रा यांच्या वकिलाने दावा केला की मिश्राने पीडितेला नुकसान भरपाई म्हणून 15,000 रुपये दिले होते, जे नंतर पीडितेच्या कुटुंबाने परत केले. त्याचवेळी, शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.