NCP: काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकतात; पवारांची मोदींवर नाव न घेता टीका

Sharad Pawar Latest Speech : स्वतंत्रता बंधुत्व याचं रक्षण केलं पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.
Sharad Pawar vs Narendra Modi
Sharad Pawar vs Narendra ModiSaam TV

शिवाजी काळे, नवी दिल्ली

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. काल, शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. "काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकतात" असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. (Sharad Pawar Latest News)

Sharad Pawar vs Narendra Modi
Mumbai: महापालिका निवडणुकीआधी शिवसेना Vs शिंदे गटात राडा; जशास तसं उत्तर देण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश, वाद चिघळणार?

शरद पवारांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पवार म्हणाले की, काही सांप्रदायिक तत्व समाजात तेढ निर्माण करत आहेत. काही लोक शपथ घेतल्यानंतर मंदिर-मशिदींचे मुद्दे काढून देशाला धोक्यात टाकले जात आहे असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्रता बंधुत्व याचं रक्षण केलं पाहिजे असंही पवार म्हणाले आहेत.

देशातील महागाईबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्याकडे महागाई वाढलीय. ४१० रुपयांचा गॅस १ हजार रुपयांचा झाला. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाही अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशाच्या सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. २०२० मध्ये चीनने एलओएसीमध्ये घुसखोरी केली. भारताची बळकवलेली जागा परत द्यायला चीन तयार नाही. मोदींनी सांगितले की, कोणीच भारताच्या सीमेत घुसखोरी केली नाही. पण त्यांनी जुमला केलाय. चीनच्या आर्मीनं नवीन गाव बनवण्याचं काम केलं. पण ते स्वीकारण्यासाठी केंद्र सरकार तयार नाही. चीनचा सामना करण्यासाठी हे सरकार सक्षम नाही. सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात लोकांनी ताकद दाखवून द्यायला पाहीजे. ईडी सीबीआय कारवाया केल्या जात आहेत, त्या विरोधात आम्ही लढायला तयार आहोत असंही पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar vs Narendra Modi
Washim Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर दोन ट्रॅकची समोरासमोर टक्कर; अपघातात दोन जण गंभीर जखमी

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही हे शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आज आपण ऐतिहासिक मैदानात एकत्र आलोय. तालकटोराचा एक इतिहास आहे. सदाशिवराव पेशवा पुण्यातून दिल्लीत आले होते. ते तालकटोरा येथे थांबले. सदाशिवराव भाऊंना कोणी सांगितलं की गंगेचं पाणी घ्या, पण सुरज बडज्यातनं वारंवार सांगितले गंगेचं दर्शन कधीही घेता येईल पण आधी दिल्ली हातात घ्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Sharad Pawar vs Narendra Modi
Mumbai Crime: मुंबई विमानतळावर तस्करीसाठी आणलेलं १२ किलो सोनं जप्त; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

पुढे ते म्हणाले की, दिल्लीनं अनेक चढउतार पाहिले. शेजारी राष्ट्र पाकिस्तान, श्रीलंका इथे हुकूमशाही पाहिली. धार्मिक तेढ पाहिला. तिथले संसदीय लोकशाही उद्धवस्थ झाली. आपण अद्याप या रस्त्याने कधी गेलो नाही. याचं कारण म्हणजे महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्या बलिदानामुळे शांतता नांदली. आपल्या देशात ५६ टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. शेतकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. केंद्राला बनवलेले तीन कायदे मागे घ्यावे लागले हे जगानं पाहिले. शेतकरी दिल्ली सीमेवर १ वर्ष बसले होते, पण केंद्र सरकारनं त्यांच्याकडे पाहिलेही नाही. निर्दोष शेतकऱ्यांना चिरडले गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com