Shraddha Walkar: 10 प्रश्न ज्याच्या अवतीभवती फिरतंय संपूर्ण प्रकरण; पोलिसांना शोधायची आहेत त्याची उत्तरे

न्यायालयाने आफताबची नार्को टेस्ट करण्यासही परवानगी दिली आहे.
Sharddha
SharddhaSaam TV

Shraddha Walkar Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणात अनेक खुलासे चौकशीत समोर येत आहे. मात्र पोलीस अद्यापही या प्रकरणातील विविध कंगोरे शोधत आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा पोलीस (Delhi Police) प्रयत्न करत आहेत. आफताबची चौकशी सुरू असताना तो चौकशीदरम्यान कट्टर गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती समोर येत आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या सदस्याने सांगितले की, आफताफ या घटनेशी संबंधित माहिती अत्यंत सामान्यपणे मांडत आहे.

दिल्ली न्यायालयाने गुरुवारी आफताबची आणखी पाच दिवस चौकशी करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने आफताबची नार्को टेस्ट करण्यासही परवानगी दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्को टेस्ट आवश्यक आहे कारण तो त्याचे विधान बदलत होता आणि तपासात सहकार्य करत नव्हता. (Latest Marathi News)

Sharddha
Shraddha Walker case : आफताबचा क्रूर चेहरा जगासमोर; त्या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा

पोलीस सूत्रांनी सांगितले की, तपासासाठी आफताबला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी नेले जाऊ शकते. श्रद्धा वालकरच्या हत्येपर्यंतच्या घटनांचा क्रम रिक्रिएट केला जाईल. मुंबई सोडल्यानंतर श्रद्धा आणि आफताबने अनेक ठिकाणी फिरल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीदरम्यान त्यांच्यात काही भांडण झाले की नाही हे तपासण्यासाठी पोलीस आरोपीसह या ठिकाणांना भेट देतील. मात्र असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अजूनही सापडलेली नाहीत.

1. श्रद्धाचा खून पूर्वनियोजित प्लानिंग करुन केला होता का?

2. या हत्येमागचा हेतू काय होता?

3. श्रद्धाला आफताबचे एखादे सत्य कळले होते, ज्यामुळे तो घाबरला होता?

4. आफताब या नात्याला कंटाळला होता का?

5. आफताबच्या आयुष्यात आणखी कोणती मुलगी आली होती, त्यामुळे श्रद्धापासून त्याला मुक्ती मिळवायची होती?

6. आफताब श्रद्धावर कोणत्या प्रकारचे दबाव टाकत होता का ज्यासाठी ती तयार नव्हती?

7. आफताब बेरोजगारीमुळे निराश होता आणि त्यामुळेच दोघांमध्ये भांडण झाले?

8. आफताब लहानपणापासूनच रागीट आहे का?

9. आफताबला मेडिकल डिसऑर्डर आहे का ज्यामुळे तो हिंसक झाला?

10. आफताबचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही ?

Sharddha
Hyderabad News: बापरे! ऑपरेशन करून तब्बल १० किलोंचा ट्यूमर काढला बाहेर; डॉ. म्हणाले हा तर फुटबॉल...

चॅट मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न

श्रद्धाची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. आफताबला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी सर्व पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. श्रद्धाचे ज्या शस्त्राने तुकडे केले गेले, त्या शस्त्राचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस आफताबकडे याबाबत चौकशी करत आहेत. पण तो पोलिसांची दिशाभूल करत आहे.

आता पोलीस आफताबचे चॅट मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. हत्या झाली त्यादिवशी आफताब कुणाकुणाशी चॅटच्या माध्यमातून बोलला हे यावरून उघड होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com