
Party Night : या जगात व्यक्ती कधी काय करतील याचा काही नेम नसतो. अनेक वेळा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असल्यास आणि ते घरी समजल्यास अनेक तरुणांना ओरडा खावा लागतो. मात्र असे अनेक कुटुंब आहेत ज्यामध्ये तरुण मुला-मुलींचे एकमेकांना डेट करणे अगदीच नॉर्मल समजले जाते. सोशल मीडियावर अशीच एक बिंधास्त तरुणी जबरदस्त चर्चेत आली आहे. या तरुणीची करामत ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. (Latest Party Viral News)
कॅडिसी डेव्हिस असं या अमेरिकन तरुणीचं नाव आहे. कॅडिसी ५ वर्षांपासून स्वत:साठी एक बॉयफ्रेंड शोधत आहे. मात्र यासाठी आतापर्यंत तिने मोठी कसरत केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ती वेगवेगळ्या डेटिंग अॅपवर सक्रिय होती. तसेच अनेक मुलांना डेट करत होती. मात्र तिला छान वाटेल असा तरुण तिला मिळाला नाही. कॅडिसी ही स्वत:एक अभिनेत्री आहे. त्यामुळे आतापर्यंत तिने जादुगार, लेखक, अभिनेता, गितकार अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना डेट केलं आहे.
एवढं सगळ करूनही तिल हवा तसा मुलगा मिळत नव्हता त्यामुळे तिने एक वेगळी शक्कल लढवली. कॅडिसीने साल २०२२ च्या व्हेलेंटाइन डेला एक सिंगल पार्टी आयोजित केली. या पार्टीत तिने एकूण ६५ अनोळखी व्यक्तींना बोलावले. तिला सुरूवातीला वाटले होते की, कोणीही येणार नाही. मात्र या पार्टीला सर्व व्यक्ती आल्या. तिने या सर्वांना डेटींग अॅप मार्फत आमंत्रण दिलं होतं.
पार्टीमध्ये आल्यावर सर्वांनी रात्रभर या पार्टीत मौजमजा केली. त्यानंतर कॅडिसी अशा प्रकारच्या अनेक सिंगल पार्ट्यांचे आयोजन करू लागली. आजवर तिने अशा प्रकारच्या १७ पार्ट्या केल्या आहेत. तिने आयोजित केलेल्या पहिल्याच पार्टीत तिला तिचा क्रश भेटला होता. त्यामुळे तिने अशा प्रकारच्या पार्ट्या पुढे अशाच सुरू ठेवल्या.
या सिंगल पार्टीमध्ये येण्यासाठी तुम्हाला डेटिंग अॅपवर असणे गरजेचे आहे. त्यातून तुम्ही ज्या व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवली आहे त्याला या पार्टीत पहिल्यांदा भेटायचे असा नियम आहे. इथे तुम्ही तुमच्या अन्य मित्र मैत्रिणींना देखील बोलावू शकता. पार्टीमध्ये येण्यासाठी १००० ते ३००० रुपये फी भरावी लागते. कॅडिसीने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या पार्ट्यांची माहिती दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.