Shinde Government : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

शिंदे गटासंदर्भात निवडणूक आयोग निर्णय देत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी माहिती सूत्रांना मिळाली.
shinde government news
shinde government news saam tv

Shinde Government News : शिंदे गटाचा जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी विस्तार नसल्याची माहिती साम टिव्हीला सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत शिंदे गटासंदर्भात निवडणूक आयोग निर्णय देत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी माहिती सूत्रांना मिळाली. मंत्रिमंडळ लांबल्याने भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. (Latest Marathi News)

shinde government news
Eknath Shinde On Sharad Pawar: शरद पवार मला नेहमी फोन करतात; CM शिंदेंनी बरंच काही सांगितलं, कौतुकही केलं

राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार कोसळणार, असे वक्तव्य विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. तर शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदार पुन्हा ठाकरे गटात (Uddhav Thackeray) जाणार, मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर आमदार, खासदार फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचा विचार भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोग लवकरच देणार आहे. त्यानंतर दोनही गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल. त्यामुळं आमदारांचा या गटातून त्या गटात जाण्याचा मार्ग बंद होईल.

shinde government news
Uddhav Thackeray Vs Bawankule: 'उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले'

मंत्रिमंडळ विस्तार होणार का?

शिंदे यांनी आमदारांना गटात घेताना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं आहे. मात्र, हे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं आज ना उद्या मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या आशेवर आमदार खासदार आहेत.

शिंदे गटातील काही आमदार अधून मधून आपली नाराजी बोलवून दाखवतात. मात्र, या आमदाराची नाराजी दूर होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने एकदा शिवसेना कोणाची हा फैसला दिला तर शिंदे फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही दबाव राहणार नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com