
लखनौ: मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुन आता उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध केला आहे. अयोध्येला यायच असेल तर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)जनतेची माफी मागावी असं सिंह यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने अयोध्येत पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमधून शिवसेनेनं मनसे आणि भाजपवर टीका केली आहे.
शिवसेनेने (Shivsena) लावलेल्या पोस्टरमध्ये “असली आ रहा है नकली से सावधान। असे लिहिले आहे. पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. दुसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाचे चित्र असून 'जय श्री राम' असे लिहिले आहे. आदित्य ठाकरे १० जून रोजी अयोध्येला जाणार असून रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
राज ठाकरेंनी अयोध्येत दर्शनासाठी ५ जूनला जाण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेनेने मनसे प्रमुखांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, असं शिवसेनेने म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोधही सुरू झाला आहे. कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध दर्शवत राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नसल्याचे जाहीर केले आहे.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयां विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी आधी ज्या उत्तर भारतीयांविरुद्ध विष कालवले आणि आता अयोध्येला जात आहेत. उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, असे भाजप (BJP)खासदार म्हणाले.
मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. ते १० जून ला अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेने अयोध्येत तयारी सुरु केली आहे. अयोध्येत शिवसेनेचे पोस्टर लागले आहेत.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.