महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
Mallikarjun Kharge News, Political Crisis in Maharashtra Saam Tv

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. आज सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आरोप करत, बंड केलेल्या आमदारांनी २४ तासात आपली मागणी उद्धव ठाकरेंसमोर मांडाली विचार केला जाईल, असं सूचक विधान केले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडावरुन आता भाजपवर आरोप सुरु झाले आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. (Political Crisis in Maharashtra)

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले(Mallikarjun Kharge), महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यामागे भाजपचा हात आहे. कारण भाजप जर तिथल्या स्थिर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती, तर आज तिथले आमदार सूरतला गेले नसते. या आमदारांना सूरतवरुन गुवाहाटीला घेऊन गेले नसेत. याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील भाजप सरकार आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. (Mallikarjun Kharge News)

Mallikarjun Kharge News, Political Crisis in Maharashtra
शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची काँग्रेसची भूमिका राहील: पृथ्वीराज चव्हाण

भाजपने या अगोदरही अशीच सरकारे पाडली आहेत. उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर मधील सरकारही भाजपने या पद्धतीनेच पाडली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन आमदार फोडले जात आहेत. महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आहे, ते पाडण्यासाठीही हाच खेळ सुरु आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन याचा मुकाबला करायला तयार आहोत. या घडामोडीला भाजपचे सरकार जबाबदार आहे,असंही खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले.

Mallikarjun Kharge News, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde Live Updates: महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न: काँग्रेस

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रयत्न

दरम्यान, मल्लिकार्जन खरगे म्हणाले, भाजपला (BJP) काहीही करुन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायची आहे. यासाठी भाजपने आता महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपला राष्ट्रपती पदासाठी आकडा हवा आहे, पण भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मला वाटते असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

गोवा, कर्नाटक, मणिपूर, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यातही या अगोदर असेच प्रयत्न झाले आहेत, अशाच पद्धतीने त्यांनी सरकार पाडले आहेत. आमदारांना ईडीची भीती दाखवून त्यांना फोडले जातात. महाराष्ट्रातही सध्या हेच सुरू आहे, पण ते महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, असंही खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com