'शिवसेना सध्या मिनी UPA मध्येच'; संजय राऊतांच स्पष्टीकरण (पहा Video)

'राज्यातील महाविकास आघाडी ही मीनी UPC च आहे. सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व कोणाकडे हे मोठे नेते ठरवणार.'
'शिवसेना सध्या मिनी UPA मध्येच'; संजय राऊतांच स्पष्टीकरण (पहा Video)
'शिवसेना सध्या मिनी UPA मध्येच'; संजय राऊतांच स्पष्टीकरण (पहा Video)SaamTV

संतोष शाळिग्राम -

नवी दिल्ली : आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले,' भेटीमध्ये काय चर्चा झाली ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना सांगणार, ती चर्चा मीडियाला कशाला सांगू' तसंच कोणतीही आघाडी होत असेल तर ती काँग्रेसशिवाय होणं अशक्य असल्याचही राऊत म्हणाले. (Shivsena is currently participating in the Mini UPA; Sanjay Raut's explanation)

हे देखील पहा -

राहुल गांधी लवकरच मुंबईमध्ये येणार आहेत. तेव्हाही चर्चा होणार आहे. तसेच आज राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. तसंच राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी देखील चौकशी केली असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

'शिवसेना सध्या मिनी UPA मध्येच'; संजय राऊतांच स्पष्टीकरण (पहा Video)
लाथा-बुक्यांनी मारहाण करत केला पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान राऊत आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA मध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज्यातील महाविकास आघाडी (MVA) ही मिनी यूपीएमध्येच असल्याच संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच सर्वपक्षीय आघाडीचे नेतृत्व कोणाकडे असणार हे मोठे नेते ठरवणार असल्याचही राऊतांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com