'आम्ही मिंदे नाही तर बाळासाहेबांचे खंदे'; मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

'एक एक उद्योग राज्यातून बाहेर निघून जात आहेत, मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे. मात्र, मिंदे गट फक्त शेळ्यांसारखा शेपट्या घालून बसला आहे.'
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySaam TV

शिवाजी काळे -

दिल्ली: 'आम्ही मिंदे नाही तर बाळासाहेबांचे खंदे आहोत, आम्ही तुम्हाला तीन महिन्यापूर्वी आस्मान दाखवलं आहे, आम्ही ठेचा खावून मोठं झाल्यामुळेच त्यांना ठेचलं आहे.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दिल्लीत शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेना गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यामेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार फटकेबाजी केली.

पाहा व्हिडीओ -

एक एक उद्योग राज्यातून बाहेर निघून जात आहेत, मुंबईचं महत्व कमी केलं जात आहे. मात्र, मिंदे गट फक्त शेळ्यांसारखा शेपट्या घालून बसला आहे. आणि होय महाराजा करत गप्प बसला आहे. आज देखील ते दिल्लीला गेले आहेत, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा प्रकार सुरु आहे. कितीवेळा दिल्लीसमोर झुकले असतील, हिंमत असेल तर पंतप्रधाना सांगा प्रकल्प मागे द्यायला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली होती.

ठाकरेंच्या याच टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही मिंदे नाही आम्ही बाळासाहेबांचे खंदे आहोत. आम्ही तुम्हाला तीन महिन्यापूर्वी अस्मान दाखवले आहेत, आम्ही ठेचा खावून मोठं झाल्यामुळेच त्यांना ठेचलंय, आपण बापाचा पक्ष आणि विचार चोरणारी टोळी? आहात का असा पलटवार देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com