औरंगाबाद विमानतळाचे 'असे' नामकरण करा; मंत्री सुभाष देसाई राजधानी दिल्लीत

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी द्यावी.
subhash desai meet union minister Jyotiraditya Scindia for urges him to speed up name changing process of Aurangabad airport
subhash desai meet union minister Jyotiraditya Scindia for urges him to speed up name changing process of Aurangabad airportSaam tv

नवी दिल्ली : मराठवाडयातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad )विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावे. औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी द्यावी , अशी मागण्या उद्योग तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया(Jyotiraditya Scindia ) यांना आज केल्या. राजीव गांधी भवन, या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये देसाई यांनी सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. ( minister subhash desai meet union minister Jyotiraditya Scindia )

हे देखील पाहा -

या झालेल्या चर्चेत देसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासना हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली. महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यातून विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीने हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन सिंधिया यांनी दिले. औरंगाबाद विमानतळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणीही देसाई यांनी केलीदेसाई यांनी सिंधिया यांना यावेळी मराठवाडयाची प्रसिद्ध शाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीवर आधारित ‘महाराष्ट्र देशा’हे पुस्तक भेट स्वरूपात दिले.

subhash desai meet union minister Jyotiraditya Scindia for urges him to speed up name changing process of Aurangabad airport
5G नंतर आता 6G ची तयारी, PM मोदीचे संकेत

पुढे देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदि देशांतून आणि वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवाशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची सद्याची धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल. तसेच पुढील प्रक्रियेसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी सिंधिया यांनी दिले.

विमान फेऱ्या वाढविण्यात याव्यात

पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही देसाई यांनी केली. मुख्यत्वे मुंबई-औरंगाबाद शहरांदरम्यान दररोज सकाळी नियमित विमान फेरी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सद्या काही शहरांमध्ये सायंकाळी विमान फेरी सुरु आहे. तथापि,पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची वाढती गर्दी व मागणी पाहता तातडीने सकाळच्या विमान फेऱ्या सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे देसाई यांनी नमूद केले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन सिंधिया यांनी दिले.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com