महाराष्ट्रातील शिवसेना संपणार; जे. पी. नड्डांच्या वक्तव्याने खळबळ

'कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल.'
J. P. Nadda Statement
J. P. Nadda StatementSaam TV

पाटणा : शिवसेना नेते संजय राऊतांच्या (Sanjay Raut) अटकेनंतर राज्यातील राजकीय घडमोडी ढवळून निघालेल्या असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मोठं विधान केले आहे. भाजपशी (BJP) मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा त्यांनी केला आहे. कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असेही नड्डा यांनी म्हटले आहे. बिहार येथील 16 जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.

पाहा व्हिडीओ -

नड्डा म्हणाले की, काँग्रेस आता देशातील अनेक राज्यांतूनही संपुष्टात येत असून, भाजप कार्यालय हे कार्यकर्त्यांचे पॉवर हाऊस आहे. इथून करोडो कार्यकर्ते जन्माला येतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष हा एक कौटुंबिक पक्ष आहे, बिहारमध्ये आम्ही कौटुंबिक पक्ष असलेल्या राजदशी लढत आहोत.

नवीन बाबूंचा पक्ष हा ओडिशातील वन मॅन पार्टी असून, महाराष्ट्रात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनाही एक कौटुंबिक पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा भाऊ-बहिणींचा पक्ष झाला असून, लढा बांधिलकीतून असतो, बांधिलकीतून ताकद जन्माला येते. भाजप हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेला पक्ष आहे.

J. P. Nadda Statement
संजय राऊतांच्या अटकेनंतर 'सामना'चा पहिला अग्रलेख; राज्यपालांसह भाजपवर टीकेचे बाण

भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. भाजपच्या वाढत्या स्वीकारार्हतेचा दावा करून ते म्हणाले की, आता देशात एक राष्ट्र एक कायदा आहे. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना मूल्य शिकवते असेही ते म्हणाले. आम्ही वैचारिक पार्श्वभूमी घेऊन उभे आहोत, असे ते म्हणाले. जर आम्हाला कल्पना नसती तर आम्ही एवढा मोठा लढा लढला नसता. आज दोन-तीन दशके इतर पक्षात राहिलेले अनेक लोक पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. काम करताना देश बदलण्याची ताकद असेल तर ती भाजपमध्येच आहे, हे या सर्वांना समजले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com