वचन हेच आमचे हिंदुत्व; अयोध्येतून आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आमचे वचनच म्हणजे हिंदुत्व आहे. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करुनच दाखवतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi News
Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi NewsSaam Tv

अयोध्या: गेल्या काही दिवसापासून सेनेच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू आहे. अखेर आज शिवसेनेचा (Shivsena) अयोध्या दौरा सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये गेले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते गेले आहेत. अयोध्येत आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हिंदुत्वारुन विरोधकांना टोला लगावला. 'आमचे वचन हेच आमचे हिदुत्व आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. तसेच ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रासाठी अयोध्येत काही घोषणा केल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले, २०१८ मध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आलो होतो, तेव्हा आम्ही 'पहिले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा केली होती. यानंतर काही दिवसांनी कोर्टाचा निकाल आला, आणि मंदिराचे काम सुरू झाले. आज आम्ही तिर्थयात्रा म्हणून आलो आहे, राजकारण म्हणून आलेलो नाही.

Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं नाही पण ईश्वराने दिलं; जल आक्रोश मोर्चात पाऊस पडताच फडणवीसांची टोलेबाजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करुन आम्ही अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा मागणार आहोत. १०० खोल्यांचे हे माहाराष्ट्र सदन असणार आहे. आम्ही या ठिकाणी कोणतेही राजकारणासाठी करण्यासाठी आलेलो नाही. आमचे वचनच म्हणजे हिंदुत्व आहे. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करुनच दाखवतो, असंही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत मंदिराचे काम सुरु झाले आहे. कोविडच्या काळात उत्तर प्रदेशाच्याही लोकांनाही आपण चांगली सेवा दिली आहे. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना राज ठाकरेंच्या संदर्भात प्रश्न विचारले, यावेळी त्यांनी मी दुसऱ्या कोणत्याही पक्षासंदर्भात बोलणार नाही, असं त्यांनी (Aditya Thackeray) उत्तर दिले.

उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेची शाखा आहे, येथेही अनेकांच्या ह्रदयात बाळासाहेब ठाकरे आहेत. पण आम्ही त्यांचा राजकारणासाठी वापर करणार नाही. राहुल गांधी यांच्यावरील ईडीच्या चौकशी संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा भाजप वापर करत आहे, प्रचार यंत्रणेसारखा ते वापर करत आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आम्हाला रामराज्य आणायचे आहे. आमचे वचन हेच हिंदुत्व आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे - धनंजय मुंडे

मुंबई महापालिकेवर रामराज्य येणार

अयोध्येत आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणावर बोलण्यास नकार दिला, पण त्यांनी मुंबई महापालिकेवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणूक संदर्भात विचारला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतही रामराज्य येणार असल्याचे म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी अयोध्येत घोषणा काय केली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रव्यवहार करुन अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागेची मागमी करणार आहे. १०० खोल्यांचे हे सदन असणार आहे. राज्यातील राम भक्तांची अयोध्येत राहण्याची व्यवस्था यासाठी हे सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com