Shocking video : संतापजनक ! कुत्र्याचे पाय बांधून दुचाकीने दूरवर फरपटलं; क्रूर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Dog :गाझियाबादच्या विजय नगर पोलीस स्टेशन क्षेत्रात घडलेल्या घटनेने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
Shocking video
Shocking videoSaam TV

Ghaziabad : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका तरुणीला कारच्या मागे फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता देखील सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या दुचाकीला पाठीमागे कुत्रा बांधला आहे आणि बराच लांबवर तो त्याला फरपटत नेत आहे. (Drags dog for 1 km)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून नेटकरी त्या व्यक्ती विरोधात संताप व्यक्त करत आहेत. सदर घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे घडली आहे.गाझियाबादच्या विजय नगर पोलीस स्टेशन क्षेत्रात घडलेल्या घटनेने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Shocking video
Nashik Crime News : नाशकात चाललंय तरी काय? सातपुरात दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार

दीड किलोमीटर फरपटले कुत्र्याला

विजय नगर पोलीस स्टेशन परिसरात एका व्यक्तीने रस्त्यावरील एका कुत्र्याचे सर्व पाय रशीने बांधले. त्यानंतर त्याने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधले आणि दुचाकी जोरदार पळवू लागला. या क्रूर व्यक्तीने त्या कुत्र्याला दीड किलोमीटर फरपटत नेले. यामध्ये कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Shocking video
Crime News : भर रस्त्यात त्याने स्वत:च्या गळ्यावर फिरवला चाकू, नंतर झाडली गोळी; VIDEO

कुत्र्याला अशा पद्धातीने फरपटत असताना रस्त्यावर सर्वत्र गोंधळ सुरू झाला होता. पीपल फॉर अॅनिमल या संस्थेतील एका व्यक्तीने ही घटना पाहताच त्या व्यक्तीला थांबले आणि कुत्र्याची सुटका केली. तसेच दुचाकीस्वाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कुत्र्याची चूक तरी काय?

ज्यावेळी हा व्यक्ती कुत्र्याला बांधत होता तेव्हा देखील तेथील व्यक्तींनी तो असं का करत आहे असं विचारलं. त्यावेळी त्याने सांगितले की, हा कुत्रा आतापर्यंत ५ जणांना चावला आहे. त्यामुळे त्याला मी दुसऱ्या ठिकाणी सोडून येत आहे. मात्र नंतर दुचाकीस्वाराने कुत्र्याबरोबर असं क्रूर कृत्य केलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com