Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्येचा उलगडा होणार? आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट

श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आरोपी आफताबने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले.
Shraddha Walker Case News
Shraddha Walker Case News SAAM TV

Shraddha Walkar Case : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आरोपी आफताबने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. सध्या पोलीस आरोपी आफताबची चौकशी करत आहेत. आज या हत्याकांडाबाबत मोठे खुलासे होऊ शकतात. कारण, दिल्ली पोलीस आज आरोपी आफताब पूनावला याची नार्को टेस्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.  (Latest Marathi News)

Shraddha Walker Case News
Shraddha Walker Case : श्रद्धा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना सापडले महत्वाचे पुरावे; आबताब लटकणार!

आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची आपणच हत्या (Crime News) केल्याची कबूली यापूर्वीच पोलिसांना दिली आहे. मात्र, त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात कुठे फेकले? याबाबत अद्यापही ठोस अशी माहिती दिलेली नाही. तो पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीतील कोर्टाने आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना (Police) आफताबकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. श्रद्धाची हत्या का केली, कशी केली, शस्त्र आणि अन्य पुरावे कुठे आहेत, या हत्येत आणखी कोण सहभागी आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा आहे.

Shraddha Walker Case News
Weather Alert : देशातील 'या' भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यादरम्यान आफताब, त्याचे करिअर आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील. आफताबने श्रद्धा वालकरला का मारले हे लवकरच कळणार आहे. तिच्या शरीराचे तुकडे कुठे फेकले गेले? हत्या का केली? आफताब ड्रग्ज घेतो का? याशिवाय आफताबकडून अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विशेष म्हणजे खुनाशी संबंधित प्रकरणात सामान्यतः नार्को चाचणी केली जाते, ज्याच्या मदतीने अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर किंवा त्याच्या माध्यमातून तपासाला वेग येऊ शकतो. श्रद्धा वालकर बेपत्ता झाल्यानंतर तपास सुरू असताना माणिकपूर पोलिसांनी दोन वेळा चौकशीसाठी आफताब पूनावाला याला बोलावले होते. तेव्हा तो सराईत गुन्हेगारासारखा वागल्याचे मत पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com