Shraddha Walkar Case: आरोपी आफताबची पाच दिवसात नार्को टेस्ट करण्याचे कोर्टाचे आदेश, पोलीस चौकशीसाठी वसईत

न्यायालयाच्या आदेशानुसार ही टेस्ट रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅब अंतर्गत होणार आहे.
Shraddha Walkar
Shraddha WalkarSaam TV

Shraddha Walkar Case: श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधून काढायची आहेत. आरोपी आफताब पूनावालाविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी केली होती. ही नार्को टेस्ट येत्या पाच दिवसांत करण्याचे आदेश साकेत न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही टेस्ट रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅब अंतर्गत होणार आहे. आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

श्रद्धा हत्याकांडाचा तपास करणारे दिल्ली पोलिसांचे  (Delhi Police) पथक महाराष्ट्रातील पालघरमध्ये पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने वसई, पालघरमधील माणिकपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. याबाबत पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे.

Shraddha Walkar
Shraddha Walkar: 10 प्रश्न ज्याच्या अवतीभवती फिरतंय संपूर्ण प्रकरण; पोलिसांना शोधायची आहेत त्याची उत्तरे

श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची अनेक काळी कृत्ये दडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाचा मित्र गॉडविनने याबाबत सांगितले की, श्रद्धाला खूप आधीच अफताबचा खरा चेहरा समजला होता. तो अंमली पदार्थांचे सेवन करायचा. याची माहिती श्रद्धाला समजल्यावर तिने तिच्या फोनमध्ये काही पुरावे गोळा केले होते. यात अफताब केव्हा अंमली पदार्थ घेत होता, तसेच तो कोणत्या व्यक्तींना ते पुरवत होता याची माहिती श्रद्धाने मिळवली होती. (Latest Marathi News)

Shraddha Walkar
Shraddha Walker case : आफताबचा क्रूर चेहरा जगासमोर; त्या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा

गॉडविनने पुढे सांगितले की, २३ नोव्हेंबर २०२० रोजी त्या दोघांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी श्रद्धाने आफताबचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तसे झाले नाही. तिने मझ्या भावाला कॉलवर सांगितले होते की, अफताब तिला खूप त्रास देत आहे. तो कधीही तिच्या जीवाचे बरेवाइट करेल असे ती आम्हाला सांगत होती. तिला आमच्या मदतीची तेव्हा गरज होती, असे गॉडविनने माध्यमांशी बोलताना सांगितले.

आफताबने १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. त्याने तिच्या शरिराचे ३५ तुकडे केले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत होता. १२ नोव्हेंबर रोजी या घटनेत आरोपी आफताबला शोधण्यात पोलिसांना यश आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com