
Murder of Shraddha Walkar : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला हा सध्या तुरुंगात आहे. आफताबला शुक्रवारी (३१ मार्च) तुरुंगातील इतर कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आफताबच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली असून त्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)
आफताबच्या वकिलाने दावा केला की, शुक्रवारी आफताबला कोर्टात हजर केले जात असताना इतर कैद्यांनी त्याला शिवीगाळ केली. हे कैदी इतक्यावरच थांबले नाही तर, त्यांनी आफताबला मारहाण देखील केली. पोलिसांनी कैद्यांच्या तावडीतून त्याची कशीबशी सुटका केली. त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा आफताबच्या वकिलांनी कोर्टात केला.
दरम्यान, या दाव्यानंतर न्यायालयाने आफताब पुनावाला याच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीच्या साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा कक्कर यांनी आफताबच्या आरोपांवर युक्तिवाद ऐकताना अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कारागृह अधीक्षकांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश आहेत की, आरोपीला यानंतर न्यायालयात हजर करताना सुरक्षितपणे हजर केले जाईल. आफताब पूनावाला यांने गेल्या वर्षी १८ मे २०२२ रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरचा गळा आवळून खून (Crime News) केला होता. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करून ते आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर अनेक दिवस तो मृतदेहाचे तुकडे शहरभर फेकत राहिला.
पोलिसांनी (Police) १२ नोव्हेंबर रोजी आफताबला अटक करून पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी त्याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली. २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून आरोपी आफताब हा जेलमध्येच आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.