Polygraph Test : पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय? ती कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर...

पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली अमेरिकेत करण्यात आला होता.
Polygraph Test
Polygraph TestSaam TV

Polygraph Test : दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवीन थक्क करणारी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून आता आरोपी आफताब याची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची परवानगी मिळवली आहे. या अगोदरच न्यायालयाने पोलिसांना (Police) आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली होती. मात्र, पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरवलं आहे. (Latest Marathi News)

Polygraph Test
Shraddha Walker : श्रद्धा प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; आफताबचं नवीन CCTV फुटेज समोर, पाहा VIDEO

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक. यात एखादा माणूस खोटं (Crime News) बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं. मात्र या चाचणीमध्ये आरोपीने सांगितलेल्या गोष्टी कितपत सत्य आहे, हे सांगणं कठीण आहे. पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली अमेरिकेत करण्यात आला होता.

पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?

पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात. व्यक्तीला आधी काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यानंतर त्याला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यादरम्यान मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते. चाचणीपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्याचे हृदयाचे सामान्य ठोके, रक्तदाब, नाडीचे प्रमाण इत्यादी नोंदवले जातात.

Polygraph Test
Parbhani News : कडाक्याच्या थंडीत पिकाला पाणी देण्यासाठी गेले; मात्र वाटेतच मृत्युने गाठलं

पॉलिग्राफ टेस्ट करण्याआधी काही सामान्य प्रश्न विचारून, त्याला आरोपी कशाप्रकारे प्रतिसाद देतोय हे पाहिलं जातं. या प्रश्नांची उत्तरं, तपासणी करणाऱ्यांना ठाऊक असतात. त्यामुळे या उत्तरादरम्यान होणारे शारीरिक बदल पाया म्हणून वापरण्यात येतात. त्यानंतर ज्या घटनांविषयी पोलिसांना शंका असते की आरोपी खोटं बोलतोय, त्याविषयीचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर झालेले बदल टिपण्यात येतात. मग आधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांशी त्याची तुलना केली जाते.

आरोपी आफताबने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. सध्या पोलीस आरोपी आफताबची चौकशी करत आहेत. आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची आपणच हत्या केल्याची कबूली यापूर्वीच पोलिसांना दिली आहे. मात्र, त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात कुठे फेकले? याबाबत अद्यापही ठोस अशी माहिती दिलेली नाही. तो पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com