Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना जंगलात सापडले १० अवयव

श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे.
Shraddha Walker Case Update
Shraddha Walker Case UpdateSaam TV

Shraddha Walker Case Update : श्रद्धा वालकर हत्याकांडानं अवघा देश हादरला आहे. या प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहेत. आता या प्रकरणात महत्वाची माहिती हाती आली आहे. दिल्ली पोलिसांना महरौलीच्या जंगलात हाडे सापडली आहेत. त्यात मणक्याचीही हाडे आहेत. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणांहून आतापर्यंत शरीराचे १० अवयव पोलिसांना आढळून आले आहेत.

श्रद्धा वालकरची तिच्याच बॉयफ्रेंडनं निर्घृण हत्या केली. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची माहिती समोर आली. दिल्ली पोलिसांनी तपास करताना महरौलीच्या जंगलात शोध घेतला असता पाठीचा कणा सापडला आहे. याशिवाय शरीराचे दहा अवयव पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी फ्लॅटचीही झडती घेतली आहे. फ्लॅटमधील किचनमध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यावरून ते रक्त नेमके कुणाचे आहे, याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.  (Latest News Update)

Shraddha Walker Case Update
श्रद्धा हत्या प्रकरण : आफताब पुनावालाचं कुटुंब गायब; पोलिसांनाी व्यक्त केला 'हा' संशय

आफताब याने फ्रिज केमिकलमध्ये स्वच्छ केला होता. दिल्ली पोलीस श्रद्धाच्या वडिलांना लवकरच डीएनए नमुने घेण्यासाठी बोलवणार आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रक्ताचे नमुने आणि हाडांचे नमुने एकत्रित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. त्यानंतर एफएसएल डीएनए तपासणी करेल. श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे बाथरूममध्ये तुकडे करण्यात आल्याचा संशय आतापर्यंतच्या तपासाअंती पोलिसांना आहे. आफताबला घेऊन पोलीस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक पथकही होते. (Crime News)

Shraddha Walker Case Update
Breaking News: श्रद्धा हत्याप्रकरणी राज्य महिला आयोग आक्रमक; पाहा काय म्हणाल्या रुपाली चाकणकर

साकेत कोर्टाने दिली नार्को टेस्टला मंजुरी

तत्पूर्वी, दिल्लीच्या साकेत कोर्टानं श्रद्धा प्रकरणातील आरोपी आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी नार्को टेस्टची परवानगी मागितली होती. आफताब हा पोलीस चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दिल्लीच्या महरौलीमध्ये झाले होते शिफ्ट

आफताब आणि श्रद्धा वालकर हे दोघे मे मध्ये दिल्लीच्या महरौलीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये १८ मे रोजी भांडण झाले होते. आफताबने गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने शरीराचे केलेले तुकडे ठेवण्यासाठी ३०० लीटरच्या फ्रीजचा वापर केला. फ्रिजमधील एकेक तुकडा काढून तो जंगलात फेकून देत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हत्येनंतर अन्य महिला त्याच्या फ्लॅटवर यायची तेव्हा तो मृतदेहाचे तुकडे फ्रिजमधून काढून कपाटात ठेवून द्यायचा. कुणालाही शंका येऊ नये म्हणून तो ते लपवून ठेवायचा. दरम्यान, पोलीस तपास करत आहेत. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अवघा देश हादरला असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com