Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणी नवा ट्विस्ट; आफताबच्या कबुलीच्या वृत्तावर वकिलांचा नवा खुलासा

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे.
Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker Case aftab poonawalaSaam TV

Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असले तरी, त्यांचा उलगडा होताना काही दिसत नाही. या प्रकरणातील गुंतागुंत सुटण्याऐवजी दिवसागणिक ती वाढतच चालल्याचे दिसते. आफताबच्या वकिलांनी मंगळवारी आणखी एक नवा खुलासा केला आहे. आफताबनं कोर्टात श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली नाही, असं वकिलांचं म्हणणं आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी सांगितलं की, आफताब दिल्ली पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत आहे. मात्र, त्यानं कोर्टात गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फेकून दिल्याचा आरोप तिचा प्रियकर आफताब पूनावाला याच्यावर आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांना मात्र या हत्येशी संबधित एकही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही. (Latest Marathi News)

Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker : श्रद्धा प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; आफताबचं नवीन CCTV फुटेज समोर, पाहा VIDEO

पोलिसांची दिशाभूल करतोय आफताब?

श्रद्धा हत्या प्रकरण उघड झाल्यानंतर यातील संशयित आरोपी आफताब आणि त्याच्याशी संबंधित रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पण आफताब पोलिसांची (Police)  दिशाभूल करत असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून दिसून येत असल्याचे मानले जाते. आफताबनं सांगितलेल्या ठिकाणांवर शरीराचे काही अवयव सापडले असले तरी, ते श्रद्धाचे आहेत का आणि मारेकरी आफताबच आहे का हे सिद्ध झालेले नाही. तसेच श्रद्धाने घातलेले कपडेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आफताब दिशाभूल करत असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवा ट्विस्ट; आफताबने बदलले स्टेटमेंट; ३५ नाही तर...

आफताबनं आतापर्यंत पोलिसांना जी माहिती दिली आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नार्को चाचणीसाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. या घटनेमागचं सत्य समोर येण्यासाठी त्याची चाचणी करण्यात येणार आहे. कोर्टानंही तशी परवानगी दिली आहे. या नार्को चाचणीआधी त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. मंगळवारी आफताबची १० दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतरही ठोस पुरावे किंवा चौकशीत काही ठोस हाती न लागल्याने कोर्टाकडून पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. या कालावधीत आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com