Shraddha Walker Case Evidence : आफताबचे कपडे, CCTV फुटेज अन् जंगलात तपास, पोलिसांच्या हाती मोठे पुरावे

श्रद्धा वालकर प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांमुळे तपासाला गती मिळू शकते.
Shraddha Walker Case Evidence
Shraddha Walker Case EvidenceSAAM TV

Shraddha Walker Case Evidence Update : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस संशयित आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधात ठोस पुरावे शोधत आहेत. दिल्ली पोलिसांना आज या प्रकरणात महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते.

दिल्ली पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. त्यात आफताब स्पष्टपणे दिसतो आहे. त्याचसंदर्भात आज पोलीस गुरुग्रामलाही गेले होते. पोलिसांनी मेटल डिटेक्टरद्वारे तपास केला. पण पोलिसांच्या हाती तिथे काही लागलं नाही. याशिवाय पोलिसांच्या हाती आज आफताबच्या फ्लॅटमधून काही कपडे लागले आहेत. त्यात श्रद्धाचे देखील काही कपडे होते.

Shraddha Walker Case Evidence
Shraddha Walker case : श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची आणखी काळी कृत्ये, धक्कादायक खुलासा

सीसीटीव्हीत नेमकं काय सापडलं?

श्रद्धा वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या हाती आज महत्वाचा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. १८ ऑक्टोबरचे ते चित्रण आहे. आफताबच्या हातात एक बॅग दिसते. आफताब त्या दिवशी बॅगमधून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जात असावा, असा संशय आहे.

श्रद्धाच्या मित्रांची चौकशी

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आज या प्रकरणात श्रद्धा वालकरच्या दोन मित्रांची चौकशी केली. पोलिसांनी आधी राहुल आणि नंतर गॉडविन या दोघांना प्रश्न विचारले. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना काही पुरावे मिळू शकतील आणि तपासाला काही गती मिळू शकेल, असे पोलिसांना वाटते.

Shraddha Walker Case Evidence
Shraddha Walkar : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; आरोपी आफताबचा आणखी एक धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या हाती आतापर्यंत काय काय लागलं?

दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या शरीरातील १३ हाडे मिळाली आहेत. मात्र, अद्याप श्रद्धाचं शीर सापडलं नाही. तिचा मोबाइल फोनही हाती लागला नाही. ज्या शस्त्राने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते, तेही अद्याप हाती लागलेले नाही. ज्या दुकानातून आफताबनं शस्त्रं खरेदी केल्याचं कथितरित्या सांगण्यात येतं, त्या दुकानदारानंही अद्याप ठोस माहिती दिलेली नाही. ज्या दुकानातून फ्रीज खरेदी केला होता, त्या दुकान मालकानेही अद्याप पेमेंटच्या बाबतीत काही माहिती दिलेली नाही. (Latest Marathi News)

पोलिसांनी आरोपीचा फोन जप्त केला आहे. आफताबची सर्व माहिती घेतली जाईल. त्याच्या संपर्कात आणखी कोणत्या मुली होत्या, याची माहिती घेतली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com