Shraddha Walker case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना शरीराचे १३ तुकडे सापडले, तिचं शीर...

तलाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह रिकामे करण्याचे काम रविवारी करण्यात आले.
Shraddha Walker case
Shraddha Walker caseSaam TV

Shraddha Walker case : श्रद्धा वालकर हत्याकांड संदर्भात पोलिसांचा शोध जलद गतीने सुरू आहे. रोज या प्रकरणात नविन खुलासे होत आहेत. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष वेधले आहे. अशात आता या प्रकरणी आणखीन एक नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी एका तलावात श्रद्धाचे शीर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रविवारी पोलिसांचे एक पथक तलावाजवळ दाखल झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली दक्षिण जिल्ह्यातील मैदानगड परिसरात एक तलाव (Lake) आहे. हे तलाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह रिकामे करण्याचे काम रविवारी करण्यात आले. अफताबने श्रद्धाचे शीर याच तलावात फेकल्याचे म्हटले जात आहे. एकून अडीच एकरमध्ये तलाव पसरलेले आहे. यातील सर्व पाणी बाहेर काढल्यावर यात श्रद्धाचे शीर शोधले जाईल. पोलिसांनी या प्रकारणात विविध बाजूंनी तपासाला सुरूवात केली आहे. श्रद्धाचा मारेकरी अफताब पुनावाला याची सातत्याने चौकशी केली जात आहे. आज पोलिसांच्या एका पथकाने तलावात शोध घेतला तसेच तिच्या शरिराचे इतर तुकडे देखील वेगाने शोधण्याचे काम सुरू आहे. पुराव्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. श्रद्धा आणि अफताबचे कपडे देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Shraddha Walker case
Shraddha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवा ट्विस्ट; आफताबने बदलले स्टेटमेंट; ३५ नाही तर...

शरीराचे १३ तुकडे शोधण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १३ तुकडे सापडे आहेत. हे सर्व तुकडे अफताबने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. त्यामुळे ते शोधण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अशात काही तुकडे जंगलात फेकल्याने हिंस्र प्राण्यांनी ते खाल्ले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी अफताबची वारंवार चौकशी करून हे तुकडे शोधले आहेत. मात्र त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. यासाठी त्यांनी अनेक दुकानांमध्ये चौकशी केली आहे.

Shraddha Walker case
Saam TV Impact | पाषाण तलाव परिसरातील प्रेमीयुगुलांना घातलेली बंदी अखेर मागे !

हत्येचा थरार पुन्हा रिक्रीएट

रविवारी पोलीस पुन्हा एकदा मेहरौली येथील अफताबच्या घरी गेले. इथे त्यांनी झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा सिन रिक्रीएट करत तपास केला. यात सुरूवातीला त्या दोघांमध्ये नेमके काय झाले. अफताबने तिची हत्या कशी केली. शरीराचे तुकडे कसे केले. तसेच त्यांची विल्हेवाट कशी लावण्यात आली हा सर्व घटना क्रम पुन्हा एकदा तयार केला. यातून पोलिसांना पुढील तपासात बरीच मदत होत आहे.

काही दिवसांपूर्वी या घटनेत पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेज लागले. १८ ऑक्टोबरचे हे फूटेज आहे. यात अफताब त्याच्या घरातून दोन तीन वेळा एका पिशवीतून काहीतरी घेऊन जाताना दिसत आहे. फुटेज हाती लागल्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा अफताबची चौकशी केली. तेव्हा त्याने १८ तारखेला श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे बाहेर फेकल्याचे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com