Shraddha Walker Case : आफताबने श्रद्धाला का मारलं? त्या रात्री काय घडलं? चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker Case aftab poonawalaSaam TV

Shraddha Walker Case Updates : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी आता या प्रकरणातील आरोपी आबताब पूनावाला याच्याविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. तब्बल ६ हजार ६२९ पानांची ही चार्जशीट असून यामध्ये आबताफने श्रद्धा वालकर हिची हत्या का केली? त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? याबाबत मोठे खुलासे केले आहेत. (Latest Marathi News)

Shraddha Walker Case aftab poonawala
Kolhapur Crime : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या; २२ वर्षांनी मिळाली पत्नीला शिक्षा

श्रद्धा वालकर  हत्या (Crime News) प्रकरणात आरोपी आबताफ पूनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी ७ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आफताबवर त्याची 'लिव्ह-इन-पार्टनर' श्रद्धाची हत्या करण्याचा आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे करण्याचा आणि राष्ट्रीय राजधानीच्या वेगवेगळ्या भागात त्यांची विल्हेवाट लावण्याचा आरोप आहे.

आफताबने श्रद्धाला का मारलं?

दिल्ली  पोलीसांनी (Police) न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, हत्येच्या दिवशी श्रद्धा एका मित्राला भेटायला गेली होती. त्यामुळे आफताबला तिचा राग आला. आरोपी आफताबला श्रद्धा कुणालाही भेटणे पसंत करत नव्हते. श्रद्धा घरी परतल्यावर आरोपी आफताबने तिला विचारले की ती कुठे गेली होती आणि कोणाला भेटली होती. श्रद्धाने त्याला सांगितले की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती.

Shraddha Walker Case aftab poonawala
Viral News : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं

यावरून श्रद्धा आणि आफताबमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात आफताफने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. ठराविक वेळी त्याने या तुकड्यांची जंगलात विल्हेवाट लावली. आरोपी आफताबची नार्को आणि पॉलीग्राफिक चाचणी करण्यात आली होती.

यावेळी अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी आपणच श्रद्धाची हत्या केल्याची कबूली आफताबने दिली. याशिवाय मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले? हे सुद्धा आफताबने सांगितलं. पोलिसांनी तपास सुरू करत श्रद्धांच्या मृतदेहांच्या तुकड्यांचा शोध घेतला. त्याचवेळी दिल्लीतील छतरपूर भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com