सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सहा जणांना घेतलं ताब्यात

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala ) यांची पंजाबमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या (Firing ) केल्याने खळबळ उडाली आहे
Siddhu Moose Wala
Siddhu Moose Wala Saam Tv

देहरादून : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala ) यांची पंजाबमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या (Firing ) केल्याने खळबळ उडाली आहे. गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात आज पंजाब (Punjab) पोलिसांनी देहरादूनमधून सहा लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला एक जण लाँरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. ( Sidhu Moose Wala Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक , रॅपर मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला आहे. त्यानंतर पंजाब पोलिसांनी सूत्र हलवत उत्तराखंडच्या देहरादून येथील एका गावाच्या चौकीजवळ एसटीएफच्या मदतीने सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमधून एक जण मूसेवाला हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे.

शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाईक झाले तयार

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांचे नातेवाईक खूपच भडकले होते. त्यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी तयार नव्हते. मात्र काही लोकांनी त्यांची समजूत घातल्यानंतर नातेवाईक तयार झाले. त्यानंतर सिद्धू मूसेवाला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी थोड्यावेळात मानसा जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

Siddhu Moose Wala
'भाजप तिसरी जागा सहज निवडून आणू शकते, शिवसेनेनं आपली मतं सांभाळावीत'

दरम्यान, पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आज पोलिस मनसाजवळील कैंचिया भागाजवळ मनसूख वैष्णो ढाब्याजवळ पोहोचले. पोलिसांनी ढाब्यातील सीसीटीव्ही कॅमेरही तपासले. त्यावेळी २९ मे रोजीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही तरुण भोजन करताना दिसत आहे. पोलिसांनी संशय आहे की, हल्लेखोर हे या ढाब्यात भोजन करण्यासाठी थांबले असावेत, या संशयाने पोलिसांनी हे फुटेज तपासले. त्यावेळी पोलिसांचे तांत्रिक पथकही त्यावेळी उपस्थित होते.

नोव्हेंबरमध्ये होणार होता विवाह

सिद्धू मूसेवाला यांचा काही महिन्यापूर्वी साखरपूडा झाला होता. त्यांची होणारी पत्नी ही पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात राहणारी होती. त्यांची होणारी पत्नी ही कॅनडामध्ये पीआर म्हणून काम करत होती. दोघांचा विवाह हा येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com