सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला एन्काउंटरची भीती

पंजाब पोलिसांकडून एन्काउंटर होऊ शकतो या भीतीमुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.
Sidhuu moosewala
Sidhuu moosewala Saam tv

नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला एन्काउंटरची भीती सतावत आहे. पंजाब पोलीस त्याचा एन्काउंटर करू शकतात, अशी भीती लॉरेन्सला आहे. पंजाब पोलिसांकडून एन्काउंटर होऊ शकतो या भीतीमुळे त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने याबाबत दिल्ली हायकोर्टात (high court) अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर हायकोर्टात आज दुपारी सुनावणी घेण्याची मागणी त्याचे वकील करणार आहेत.

Sidhuu moosewala
सूर्याकडे पाहून थुंकणाऱ्यांच्या तोंडावरच थुंकी पडते; फडणवीसांचा शिवसेना नेत्यावर हल्लाबोल

दिल्ली हायकोर्टात बिश्नोईच्या वकिलांनी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार बिश्नोईची कोठडी पंजाब किंवा अन्य राज्याच्या पोलिसांकडे (Police) दिली जाऊ नये, अशी विनंती वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेद्वारे केली आहे. तुरुंगातही अन्य राज्यांचे पोलीस चौकशी करू शकतात, असेही याचिकेत म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाऊ शकते. पंजाब पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करून एन्काउंटर करू शकतात किंवा विरुद्ध टोळीकडून हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीतीही याचिकेद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगात त्याची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी विनंतीही त्याने याचिकेद्वारे केली आहे.

Sidhuu moosewala
CM बद्दल बोलाल, तर PMची आठवण करून देऊ; दीपाली सय्यद यांनी भाजपला ललकारलं

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात सोमवारी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली होती. तसेच त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत झडतीही घेतली होती. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मुसेवालाची रविवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या दाव्यानुसार, या हत्येच्या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे. बिश्नोईचा जवळचा साथीदार गँगस्टर लकी उर्फ गोल्डी याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com