सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी नवी माहिती समोर; रेकी करणाऱ्याने केला मोठा खुलासा

गायक मुसेवाला हत्येसंबंधी रोज नवे खुलासे समोर येत आहेत.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी नवी माहिती समोर; रेकी करणाऱ्याने केला मोठा खुलासा
Sidhu Moose Wala case news Saam Tv

नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येबाबत रोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. मुसेलावा यांच्या घराची रेकी केल्याचा आरोप असलेला संदीप केकडा पोलिसांच्या ताब्यात आहे. आता संदीप केकडाने हत्येसंबंधी अनेक खुलासे केले आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या घराची रेकी करत असताना मला फक्त मुसेवाला याला मारहाण करायची आहे, ठार मारण्याचे काही सांगितले नव्हते, असा खूलासा संदीप केकडा याने पोलिसांसमोर केला आहे.

गेल्या काही दिवसापासून पोलीस मुसेवाला यांच्या हत्येतील आरोपींचा शोध घेत आहेत. या संबंधी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Police) दोन आरोपींना अटक केली आहे. संदीप केकडा ज्या दिवशी तो रेकी करण्यासाठी मुसेवाला यांच्या घरी पोहोचला, त्या दिवशी त्याने कॅनडात असलेल्या गोल्डी ब्रारला याची माहिती दिली होती. हत्येच्या दिवशी रेकी करताना केकडाने गोल्डी ब्रारशी ११ वेळा संभाषण केले होते.

Sidhu Moose Wala case news
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

गोल्डी हा मोठा गॅगस्टर आहे हे केकडा याला माहित नव्हते, पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याला गोल्डी संबंधात माहिती मिळाली. ज्यावेळी आरोपींना गाडी दिली त्यावेळी त्या गाडीत ३ लाख रुपये आणि हत्यारे होती. आरोपींना त्या कार जवळ मीच सोडले असल्याचा दावा केकडा याने केला आहे, पण त्यावेळी ते मुसेवाला याची हत्या करणार आहेत हे माहित नव्हते, असंही त्याने पोलिसांना (Police) सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात ६ शार्प शूटर असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. सौरव महाकाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याला मुसेवाला यांच्या (Sidhu Moose Wala) हत्येसाठी ३ लाख ५० हजार रुपये दिल्याचे समोर आले आहे.

Sidhu Moose Wala case news
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागे खलिस्तान्यांचा हात? पाकिस्तानच्या ISI चं ही कनेक्शन?

पोलिसांनी (Police) संशयितांचे ८ छायाचित्रे जारी केली असून यापैकी सहा जण शार्प शूटर आहेत. या खूनामधील चौघांना ताब्यात घेतले आहे. याअगोदर दिल्ली पोलिसांनीही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचा दावा केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com