Salary Hike : जन्म दर वाढण्यासाठी सिक्कीम सरकारची मोठी योजना; २ मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना मिळणार पगारवाढ

भारतातील एक राज्य लोकसंख्या वाढवण्यासाठी राज्यातील महिलांना प्रोत्साहन देत आहे.
Currency
CurrencySaam Tv

Sikkim News : एकीकडे देशात जन्मदर कमी करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी राजकीय पक्ष करत आहेत. मात्र, भारतातील एक राज्य लोकसंख्या वाढवण्यासाठी राज्यातील महिलांना प्रोत्साहन देत आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाम यांनी मकर संक्रातीला राज्याची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांनी जर दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर त्यांना दुप्पट वेतनवाढ करण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

Currency
BJP News : भाजपने जे.पी नड्डांना पुन्हा अध्यक्ष का केलं? समोर आली मोठी कारणं...

सिक्कीमचे (Sikkim) मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाम यांच्या म्हणण्यानुसार, सिक्कीमचा जन्मदर घटत आहे. सिक्कीमच्या जन्मदरात घट होणे चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जन्मदरात वाढ होण्याची गरज आहे'. यावेळी दोन मुलांना जन्म देणाऱ्या सरकारी महिलांना (Women) वाढीव पगाराची घोषणा केली.

दरम्यान, महिलेने तिसऱ्या अपत्यास जन्म दिल्यास त्यावर महिलेला आणखी इतर सुविधा देण्यात येणार आहे. सिक्कीम हे असे राज्य ठरले आहे, ज्या राज्यात जन्मदर (Child Birth Rate). वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.यापूर्वी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कॅबिनेटने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी आई होणाऱ्या सरकारी महिलेला बाळंतपणासाठी 365 दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. तर बाळाच्या वडिलांना 30 दिवसांची सरकारी पितृत्व सुट्टी सरकारने दिली आहे.

Currency
नारायण राणेंच्या सभेतील गोंधळ प्रकरण; अनिल परब, बाळा नांदगावकर, सदा सरवणकर यांच्यासह अन्य नेत्यांना न्यायालयाचे खडेबोल

दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला कोणत्या सुविधा मिळणार?

आई होणाऱ्या सरकारी महिलेला 365 दिवसाच्या सुट्टीची घोषणा सरकारने केली आहे. बाळाच्या वडिलांना 30 दिवसांची सरकारी सुट्टी मिळणार आहे.

फक्त सरकारी महिला कर्मचारीच नाही तर बाळाला जन्म देणाऱ्या सर्वसामान्य महिलांना देखील सरकार मदत करणार आहे. महिलेला बाळ होण्यासाठी मेडिकली अडचण येत असेल तर सरकार IVF सेंटर तयार करून दवाखान्यासाठी 3 लाख रुपये खर्च करणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com